कांदा महाबँक उत्पादकांना तारणार? नाशिकसह ‘या’ ३ जिल्ह्यांत होणार प्रकल्प, शेतकऱ्यांचं काय म्हणणं?
कांद्याची नासाडी रोखली जाऊन साठवणुकीला चालना मिळावी यासाठी अणुऊर्जा आधारीत कांदा महाबँक प्रकल्प सुरू होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. यासाठी राज्यात नाशिकसह अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे. दोन वर्षांपासून कांद्याची होणारी परवड पाहता कांद्याबाबत शासनाने महाबँकेसाठी दाखविलेली संवेदनशीलता हे ही नसे थोडके अशा आशयाच्या प्रतिक्रीया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. तर महाबँक केल्याने कांदा साठवणूक होईल पण हमीभाव दीर्घकाळ घसरलेलेच राहिले तर महाबँकेचा उपयोग काय? अशा आशयाच्या प्रतिक्रीयाही शेतकऱ्यांच्या एका वर्गातून व्यक्त होत आहेत.