नांदेड : वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ऊसतोड कामगाराचा मुलगा मोटार वाहन अधिकारी होतो. हे तरुणाईसाठी प्रेरणादायीच. परंतु सेवेतील अवघ्या चार वर्षातच वाहन चालन प्रक्रियेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी ९ हजार रुपयाची लाच घेताना आरटीओ विभागातील सहाय्यक वाहन निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकतो अन् मेहनतीवर पाणी फिरवतो. भूषण जवाहर राठोड, असे लाचखोर अधिका-याचे नाव आहे. नांदेड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. या घटनेने आरटीओ विभागात खळबळ उडाली आहे.यातील तक्रारदार हे श्री. गुरुकृपा मोटार ड्रायव्हिंग स्कूल नांदेड येथे सेवक म्हणून कामास आहेत. सदर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या २० प्रशिक्षणार्थी चालकांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत हे सर्व जण नापास झाले होते. सदर प्रशिक्षणार्थीना पास करण्याच्या मोबदल्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक भुषण राठोड यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ९ हजार रुपये ठरले. दरम्यान याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. २५ जुलै दुपारी आरटीओ अधिकाऱ्यास ९ रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली होती.
भूषण राठोड हे मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील ऊसतोड मजूर होते. वडिलाच्या निधन झाले, अश्या प्रतिकूल परिस्थितीत सुभाष राठोड यांनी एमपीएससीच्या माध्यमातून सहायक वाहन निरीक्षक पदासाठी परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवलं. चार वर्षापूर्वी सुभाष राठोड हे नांदेडच्या आरटीओ कार्यालयात कार्यरत झाले होते. ४० ते ४५ हजार रुपये पगार होती. चार वर्षाच्या सेवेतच अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

आरटीओ विभागात दलालांचा सुळसुळाट
शहरातील प्रादेशीक कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून सर्वश्रुत आहे. साधे शिकावू परवाना असो की अन्य कोणतेही काम येथे दक्षिणा घेतल्याशिवाय होत नाही, अशी ओरड होत असते. तर कार्यालयातील काम हे दलालांशिवाय होत नाही, याचाही सर्वाना अनुभव आहे. यातूनच अनेक वेळा शासनाकडे आणि लाच लुचपत विभागाकडे तक्रारी होत असतात. यात काही जण यापुर्वी गळाला लागले असून आणखी एकाची भर पडली आहे. वसूलीवरून अधिकाऱ्यामध्ये वाद देखील झाले होते. पोलीस ठाण्या पर्यंत वाद गेला होता.