फाटक बंद, स्कूल बस रुळांवर अडकली, चालकाची समयसूचकता, नागपुरात भीषण अपघात कसा टळला?

नागपूर : रेल्वे फाटक अचानक बंद झाल्याने ४० शाळकरी मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली. त्याचवेळी एक ट्रेन दुसरीकडून रुळावर येत असताना पाहून सर्व शाळकरी मुलं घाबरले. मात्र तिथे उपस्थित लोकांचा आणि रेल्वे चालकाच्या समयसुचकतेने एक मोठी दुर्घटना टळली.मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी सायंकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूल बस MH-40 BG-7730 क्रमांकाची बस ४० शाळकरी मुलांना घेऊन खापरखेडा येथे महानिर्मितीचा औष्णिक वीज निर्मिती अधिकारी आणि कर्मचारी वसाहतीकडे निघाली होती. ही स्कूल बस नागपूर – छिंदवाडा रेल्वे फाटक ओलांडत असतांना अचानक रेल्वे फाटक बंद झाल्याने ही स्कूल बस रेल्वे रुळावर अडकली, त्यासोबत एक कारही अडकली. फाटक बंद झाल्याने ती बस आणि कार मागे ही जाऊ शकले नाही.
Prabhat Jha Death : माजी राज्यसभा खासदार प्रभात झा यांचे निधन, ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास, भाजपवर दुःखाचा डोंगर

मात्र, त्याचवेळी दुसऱ्या दिशेने छिंदवाडाच्या दिशेने छिंदवाडा – नागपूर पॅसेंजर ट्रेन नागपूरच्या दिशेने येत होती. दरम्यान ही ट्रेन जवळ येत असल्याची पाहून शाळकरी मुलं, ड्राइवर आणि तिथे असलेले नागरिक घाबरले असून मुलांनी आरडाओरडा सुरू केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून तिथे असलेल्या नागरिकाने तिथे असलेला एक लाल रंगाचा कठडा रेल्वे रुळावर आणून ठेवत रेल्वेचालकाला सावध केले. दरम्यान रेल्वे चालकाला रेल्वे रुळावर लाल कठडा ठेवल्याचे दिसल्याने काही तरी विपरीत असल्याचे संशय आल्याने रेल्वे चालकाने तातडीने ट्रेनचे ब्रेक लावले. ब्रेक लावल्याने ही ट्रेन काही वेळाने रेल्वे फाटक येण्याआधी थांबली. ट्रेन थांबल्याचे पाहून शाळकरी मुलं, ड्राइवर आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर गेटवर असलेल्या गेटमन ने दुसऱ्या बाजूने फाटक उघडले आणि तिथे अडकलेली स्कूलबस आणि कार बाहेर निघाली.

Source link

nagpur chhindwara railway gate school busnagpur marathi newsNagpur newsschool bus stuck at railway gateनागपूर छिंदवाडा रेल्वे गेट स्कूल बसनागपूर बातम्यानागपूर मराठी बातम्यास्कूल बस रेल्वे गेट अडकली
Comments (0)
Add Comment