काय आहे प्रकरण?
या प्रकरणी द्वारकादास गोविंदराव चिखलीकर (वय ५८, रा. अरुणोदय कॉलनी) यांनी सातारा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून, २५ जून रोजी सकाळी नऊ वाजता दत्तमंदिर, देवळाई चौक येथे असताना त्यांना मोबाइलवर +९१८११९८२८६५५ वरून कॉल आला. तुमच्या नावाने दिल्लीत इंग्लंडहून पार्सल आला असल्याचे सांगितले. हे पार्सल सोडविण्याससाठी २९ हजार ५०० रूपये रक्कम भरावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. द्वारकादास चिखलीकर यांनी एका बँक खात्यावर पैसे भरले. यानंतर त्यांनी पुन्हा एक लाख रुपये भरले. त्यानंतर याच पार्सलमध्ये ७५ हजार पौंड आहेत. हे सांगण्यात आले. यानंतर पुन्हा चिखलीकर यांनी दहा हजार रुपये भरले. यानंतर त्याच अकाउंटवर दोन लाख ८४ हजार ५०१ रूपये आले आहे. या पौंडची देशाच्या रुपयांमध्ये तीन कोटी ७८ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. सदर रक्कम सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबरवरून कॉल करून आणखी पैसे भरण्यास सांगितले. वारंवार पैशांची मागणी होत असल्याने अखेर द्वारकादास चिखलीकर यांनी फसवणूकीचे कॉल करणाऱ्या पाच मोबाइलधारकांच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे
अटक होण्याची घातली भीती
द्वारकादास चिखलीकर यांनी आधी काही पैसे भरले. यानंतर सदर पैसे कन्व्हर्ट करण्यासाठी पैसे लागता, आरबीआयचे चार्जेस लागतात. बाहेरच्या देशातून पैसे आल्यानंतर चार्जेस लागतात. असे व्हॉ.टसअॅप मॅसेज करून पैशांची मागणी करण्यात आली. याशिवाय राजनैतिक अधिकारी भारतात येतील. तुमचे तुम्हाला तीन कोटी ७८ लाख रुपये देणार आहे. तुम्ही उद्याच्या उद्या २२ लाख रुपये भरा; अन्यथा राजकीय अधिकाराचा अपमान म्हणून तुम्हाला अटक करण्यात येईल. अटक करून तुम्हाला तुरुंगामध्ये टाकले जाईल. तुमच्या विरोधात मनी लॉँड्रिंगची केस टाकण्यात येणार आहे. अशी धमकी देण्यात आली.