Buldhana Crime: मामीमुळे लग्न होत नाही, गैरसमजातून तरुणाचं धक्कादायक पाऊल अन् चिमुकल्यानं गमावला जीव, काय घडलं?

बुलढाणा: जिल्ह्यात सध्या एकामागे एक गुन्हे घडत आहे. आता नुकतीच चिखली तालुक्यातील अंबाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नातेवाईकानेच घात केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील अंबाशी येथील अरहान शेख या १० वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना २३ जुलै रोजी उघडकीस आली होती. २२ जुलैच्या सकाळी ९ वाजेपासून अरहान बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या अपहरणाची तक्रार चिखली पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी अरहानचा अतिशय निर्दयतेने खून केल्याचे समोर आले.
France Railway Attacked: फ्रान्सच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कवर मोठा हल्ला; पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या आधी जाळपोळ अन् तोडफोडीच्या घटनेमुळे रेल्वे सेवा विस्कळीत
अरहानचा सख्खा आतेभाऊ अन्सार शेख याने अरहानचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेणाच्या उकिरड्यात टाकल्याचे उघडकीस आले. आता या खून प्रकरणाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. सोयरीकीच्या वादातून अन्सारने अरहानचा खून केला असल्याचे समोर आले आहे. आरोपी अन्सारने पोलिसांना अरहानच्या खुनाचे कारण सांगितले. आरोपी अन्सारच्या बहिणीचे लग्न व्हायचे आहे. त्यासाठी ८ महिन्याआधी एक स्थळ आले होते. मात्र काही कारणास्तव ही सोयरिक जुळून आली नाही. मामीमुळेच सोयरिक तुटल्याचा राग अन्सारच्या मनात होता.बहिणीचे लग्न होत नसल्याने अन्सारचेही लग्न होत नव्हते. त्यामुळे अन्सारच्या मनात राग होता, मामीचाच काटा काढायचा त्याचा प्लॅन होता, मात्र ते त्याला जमले नाही. त्यामुळे अरहानचा खून करण्याची योजना आरोपी अन्सारने बनवली. अरहान हा नेहमी त्याच्या वडिलांसोबत राहायचा, त्यामुळे एकटे पाहून संधी साधायची असे अन्सारने ठरवले. २२ जुलैला अरहान एकटा असल्याचे पाहून मनात राग असल्याने डाव साधला. दोरीने गळा आवळून अरहानचा खून केला आणि मृतदेह पोत्यात टाकून उकिरड्यात पुरला, असे आरोपी अन्सार यांने सांगितले.

नेमकं काय घडलं?

चिखली तालुक्यातल्या आंबाशी येथील १० वर्षीय अरहान शेख हारून या चिमुकल्याचा घराजवळ खेळत असताना दोन दिवसांपूर्वी अपहरण झाले होते. दरम्यान त्याचा शोध घेतला असता अरहान आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी युद्धपातळीवर चिमुकल्याचा शोध घेतला. गावातीलच चिमुकला अरहानचा नातेवाईक असलेल्या शेख अन्सारला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह उकिरड्यात पुरला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अरहानचा मृतदेह रात्रीच उकिरड्यातून काढून त्या मृतदेहाला ताब्यात घेतले. आरोपी शेख अन्सार शेख नसीर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. मात्र यामुळे आंबाशी गाव परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Source link

buldhana boy murder newsbuldhana crimeBuldhana murder newsbuldhana newsबुलढाणा बातमीबुलढाणा मुलगा हत्या प्रकरणबुलढाणा हत्या प्रकरणमुलगा हत्या प्रकरण
Comments (0)
Add Comment