शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये अळ्या, मेळघाटातील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार

म. टा. वृत्तसेवा, अमरावती : मेळघाटातील गडगाभांडुप जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शुक्रवारी वाटण्यात आलेल्या मिलेट्‌स चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या आहेत. या घटनेसाठी जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर पालकांनी कारवाईची मागणी केली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शाळा आणि अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. शालेय पोषण आहार हा याच योजनेतील एक भाग आहे. चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गडगाभांडुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिलेट्स चॉकलेट वाटण्यात आले. घरी जाऊन चॉकलेटचे वेष्टन उघडताच अळ्या आढळल्या.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! जिल्हापरिषद शाळेच्या पोषण आहारात किडे, जेवणाचे ताटही अस्वच्छ, घटनेनं खळबळ

चॉकलेटमध्ये अळ्या मुख्याध्यापकांकडे तक्रार, त्यांचे कंत्राटदाराकडे बोट

मुलांना पोषण आहार म्हणून वाटण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्याध्यापकांना याविषयीची माहिती देण्यात आली. त्यांनी कंत्राटदाराकडून हे चॉकलेट वाटण्यात आल्याचे सांगितले. इयत्ता पाचवी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सदर चॉकलेटचे वितरण करण्यात येत आहे.
Government School Teacher : १२वीतील मुलीसोबत शाळेतील शिक्षकाचं धक्कादायक कृत्य; तु पास झाली, तर ….; संतप्त पालकांनी पाहा काय केलं

शालेय पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत उंदराचं पिल्लू सापडल्याने खळबळ

जळगाव : शालेय पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत उंदराचं पिल्लू सापडल्याने एकच खळबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला. तांदळात उंदीर सापडल्याचा प्रकार स्वयंपाकादरम्यान गृहिणी तेजस्वी देवरे यांच्या लक्षात आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी आता काय कारवाई होते? ते पाहणे महत्त्वाचे आहे.

संबंधित प्रकरण तापलं तर या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली जाऊ शकते किंवा एखाद्या अधिकारावर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते. मात्र, हा प्रकार धक्कादायक असल्याने अंगणवाडी बालकांचे आरोग्य या पोषण आहारामुळे धोक्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

Source link

Amravati newslarvae found on ChocolateMelghat ZP Schoolचॉकलेटमध्ये अळ्यामिलेट्‌स चॉकलेटमध्ये अळ्यामेळघाटातील शाळेत चॉकलेटमध्ये अळ्या
Comments (0)
Add Comment