शेतकऱ्यांचे पैसे हडपून विधानसभेसाठी वापरायचे आहेत का? शेतकरी संघटनेचा सवाल

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मालकीचा असलेला भाऊराव सहकारी साखर कारखाना कधी एफआरपी रक्कम करून तर कधी ऊस गाळपच्या विषयावरून नेहमी चर्चेत असतो. आता पुन्हा ऊसतोड वाहतुकीच्या खर्चात तिप्पटीने वाढ करून कारखाना चर्चेत आला आहे. वाहतूक खर्चात वाढ करून कारखान्याने शेतकऱ्यांच्या ७५ कोटी रुपयांवर डल्ला मारल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेने साखर संचालकांना निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथे भाऊराव सहकारी साखर कारखाना आहे. माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या मालकीचा हा साखर कारखाना आहे. या कारखान्यात नांदेडसह अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यातील शेतकरी ऊस कारखान्याला देत असतात. कारखान्याकडून दरवर्षी ऊसतोड वाहतूक खर्चात ३० ते ४० रुपयांची वाढ केली जाते. पण यावर्षी थेट १०० ते १३० रुपयांची वाढ केली आहे. युनिट एक मध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर युनिट दोन मध्ये १३० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
Yavatmal News: साखर कारखाना पुन्हा अडचणीत; करार रद्द करण्यासाठी ‘भैरवनाथ शुगर’ची जिल्हा बँकेला नोटीस

कारखाना ७५ कोटी रुपये अतिरिक्त कमावतोय, शेतकरी संघटनेकडून चौकशीची मागणी

हा खर्च एफआरपीच्या रकमेतून वजा करून शिल्लक पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. त्यामुळे अवाजवी वाढ करून शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याचा आरोप स्वाभिमानीने केलाय. गाळपाच्या प्रमाणात अतिरिक्त पैशांची वाढ पहिली तर त्यातून जवळपास कारखाना ७५ कोटी रुपये अतिरिक्त कमावत आहे. त्यामुळे याची चौकशी करावी अशी मागणी संघटनेने साखर संचालक यांना निवेदन देऊन केली आहे.

शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मारलेत, विधानसभा निवडणुकीसाठी वापरायचे आहेत का?

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कारखान्याचे पूर्ण कर्मचारी आणि यंत्रणा अशोक चव्हाण यांच्यासाठी काम करते. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मारून भोकर विधानसभा निवडणुकीसाठी वापरायचे आहेत का असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी केला आहे.

Source link

Ashok Chavanbhaurao Co Operative Sugar millbhaurao sahakari sakhar karkhanashetkari sanghatanaअशोक चव्हाणअशोक चव्हाण बातम्याभाऊराव सहकारी साखर कारखानाशेतकरी संघटना
Comments (0)
Add Comment