Crime News: तीन महिन्यांपूर्वीच लेकीचं लग्न; बापानेच कपाळावरच कुंकू पुसलं, जावई रक्ताच्या थारोळ्यात, नेमकं काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : प्रेमविवाह केल्याचा रागातून, मुलीच्या वडील व काकांनी, मुलीच्या नवरा अमित साळुंखे याला घरासमोर एकटे गाठून त्याच्यावर चाकूने वार केले. पोटात चाकू खुपसल्यानंतर अमितवर तीन ते चार वार करण्यात आले. ही घटना इंदिरानगर गारखेडा भागातील पुंजाबाई चौकात घडली. जखमी अवस्थेत अमित साळुंखे याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहा दिवसानंतर अमित सांळुखे याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. या प्रकरणी खून करणारा मुलीचा काका अप्पासाहेब किर्तीशाही व त्याच्यासोबत मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अमित सांळुखे यांचे वडील मनोहर साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमित सांळुखे यांचे लग्न परिसरात राहणाऱ्या मुलीशी झाले होते. या दोघांनी प्रेमविवाह केला होता. हा प्रेम विवाह झाल्यानंतर मुलीचे वडील व त्याच्या घरातील अन्य सदस्य हे खुनशी वृत्तीने अमितकडे पाहत असत. अमित सांळुंखे १४ जुलै रोजी रात्री १०.५५ वाजेच्या दरम्यान घराबाहेर पायी फिरत असताना त्याच्यावर गीताराम किर्तीशाही आणि अप्पासाहेब किर्तीशाही या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. ‘तू माझ्या मुलीसोबत लग्न करून माझ्याच घरासमोर राहतो का?’ असे विचारून ‘गीताराम किर्तीशाहीने त्याचा भाऊ अप्पासाहेब किर्तीशाहीला चाकू मारण्यास सांगितले. अप्पासाहेब किर्तीशाही याने आमितच्या पोटात चाकू खुपसला. त्यानंतर त्याच्या तळहातावर, डाव्या मांडीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. अमित साळुंखे याच्यावर घाटीत उपचार सुरू होते. या प्रकरणी अमित यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून गीताराम किर्तीशाही आणि अप्पासाहेब किर्तीशाही (दोघे रा. इंदिरानगर, गारखेडा) या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News: दोघांचं भांडण तिसऱ्याचा तुटला अंगठा, पार्किंगच्या वादात भयंकर कृत्य, नेमकं काय घडलं?
दरम्यान, अमित याच्यावर उपचार सुरू असताना, २५ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अप्पासाहेब किर्तीशाही व गीताराम कीर्तीशाही या दोघांच्या विरोधात जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक दिलीप चंदन यांनी दिली. या हल्ल्यानंतर मारेकरी अप्पासाहेब कीर्तीशाही फरारी असून, त्याचा पोलिस शोध घेत आहे.

तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह

अमित याने परिसरात राहणाऱ्या मुलीसोबत दोन मे २०२४ रोजी लग्न केले होते. अमितने ज्या मुलीसोबत लग्न केले होते, ती दुसऱ्या समाजाची होती. लग्न केल्यानंतर अमित त्याच्या पत्नीसोबत इंदिरानगर भागात राहत होता. अमितच्या घरातील सदस्यांनी प्रेमविवाह स्वीकारला; पण मुलीच्या वडिलांनी हा प्रेमविवाह स्वीकारला नव्हता. मुलीशी प्रेमविवाह करून घरासमोरच राहत असल्याचा त्यांना राग होता, अशीही माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

Source link

father in law killed son in lawjawaharnagar police stationlove marriage caselove marriage crime newsछत्रपती संभाजीनगर क्राईम बातमीछत्रपती संभाजीनगर बातम्याप्रेमविवाह पती-पत्नी
Comments (0)
Add Comment