मध्य रेल्वे
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५
परिणाम : ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
परिणाम : सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वे
स्थानक : बोरिवली ते भाईंदर
मार्ग : अप आणि डाऊन धीम्या
वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२ ते रविवारी पहाटे ४.३५
परिणाम : ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा आणि पहाटे लवकर धावणाऱ्या लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून, काही फेऱ्य रद्द राहणार आहेत.
वारीसाठी रेल्वेतून १.६६ लाख भाविकांचा प्रवास
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाऊन वारी अनुभवता यावी व लाडक्या विठ्ठल-रखुमाईचे दर्शन भाविकांना घेता यावे, यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध केली होती. या माध्यमातून एकूण ११ लाख १९ हजार भाविकांनी प्रवास करत यंदाची वारी अनुभवली. मध्य रेल्वेने सर्वच विभागांतील प्रमुख रेल्वे स्थानकांतून पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवल्या होत्या. आषाढी एकादशी आणि वारीनिमित्त २१२ गाड्या चालवण्यात आल्या असून, यातून १.६६ लाख भाविकांनी प्रवास केला. यातून रेल्वेने ८७.०२ लाखांचा महसूल गोळा केला.