नवी मुंबई : बेलापूर इमारत दुर्घटनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या एका व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन पथकाला यश आले आहे. पहाटेच्या सुमारास कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली येऊन आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जण अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यातील एकाला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
बेलापूरातील सेक्टर ९ च्या शहाबाज गावातील जी प्लस ३ ची ही इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली. यामध्ये रिक्षावाल्याच्या प्रसंगावधनाने मोठी जीवितहानी टळली. पण दुर्दैवाने काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले यातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर ६४ वर्षांचा पुरुष आणि ४५ वर्षांची महिला असे दोघेजण अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले गेले आहे आणि उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल केले गेले. यानंतरही काही जण अडकल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दलाने ढिगारा हटवण्याचे काम सुरु असून बचावकार्यही सुरु केले आहे.
५ ते ६ तासांच्या शोधकार्यानंतर आणखी एका व्यक्तीला बाहेर काढण्यात अग्निशमन पथकाला यश आले आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तर आपदग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्याच्या नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

मुंबईसह नवी मुंबईमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. यातच ही मोठी दुर्घटना घडली आहे. पहाटे ४ च्या सुमारास ही ‘इंदिरा निवास’ इमारत कोसळली. इमारतीखाली एक रिक्षावाला आला असता त्याला बिल्डींगच्या पिलरमधून आवाज येत होता. त्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि इमारत रिकामी केली. अवघ्या १५ मिनिटांत इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर पुढील ५ मिनिटांत ही इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवासी भयभीत झाले असून आजूबाजूचा परिसरही हादरला आहे.