Bathing Mistakes : बऱ्याच लोकांचे असे मत आहे की वास्तुशास्त्रातील सिद्धांत आणि नियम फक्क दिशेपुरते मर्यादित नाही. वस्तुस्थिती अशी आहे की भारताचा प्राचीन वारसा असलेली ही विद्या मनुष्याचे सर्वसामान्य जीवन आणि दैनंदिन घडमोडींशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण दैनंदिन जीवनात काही चुका करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या पूर्ण जीवनावर होतो. काही चुका अशा असतात ज्या लक्ष्मीला नाराज करतात, आणि लक्ष्मी घरातून निघून जाते. तुम्ही कधी विचार केलाय त्या गोष्टी कोणत्या असतील, जाणून घेऊया या लेखात
आंघोळीनंतर बादलीत अस्वच्छ पाणी सोडू नका
बऱ्याच वेळा असे दिसून येते की लोक स्नानानंतर बादलीत अस्वच्छ पाणी तसेच सोडून देतात. ही चूक फार नुकसानकारक ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार ही चूक लोकांना कंगाल बनवू शकते. तसेच या सवयीमुले राहू आणि केतू नाराज होऊ शकतात. ही चूक घरी आर्थिक नुकसानीचे कारण बनते.
बाथरूममध्ये गळलेले केस टाकू नका
आंघोळ करताना केस गळणे ही बाब अगदी सामान्य आहे. आंघोळीनंतर तुम्ही जर बाथरूमध्ये गळलेले केस तसेच टाकून येत असाल, तर ही सवय तुम्हाला बंद केली पाहिजे. असे केल्याने शनी आणि मंगळ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. या दोन्ही ग्रहांचा कोप तुमच्यावर होऊ शकता. वातावरणात नकारात्मकता वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यापारात नुकसान सोसावे लागू शकते.
आंघोळीनंतर कपडे धुवू नका
काही लोकांना सवय असते की स्नान करून कपडे धुवून बाथरूममधून बाहेर यायचे. पण ही सवय तुम्हाला कंगाल बनवू सकते. स्नान केल्यानंतर जुने आणि अस्वच्छ कपडे धुणे चांगली सवय नाही. ही कामे आंघोळ करण्यापूर्वी करावीत.
आंघोळीनतंर ओले आणि अस्वच्छ कपडे बाथरूमध्ये सोडू नका
आंघोळीनंतर ओले आणि अस्वच्छ कपडे बाथरूमध्येच सोडून येण्याची सवय अनेकांना असते. या सवयीमुळे तुमच्या कुडंलीतील सूर्य नाराज होऊ शकतो. जर सतत तुम्ही ही चूक करत असाल तर जीवनात यश आणि सन्मानात कमी होऊ शकतो.
आंघोळीनंतर लगेच कुंकू लावू नका
बऱ्याच महिला स्नानानंतर लगेच कुंकू लावतात, पण तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या स्त्रीया असे करतात त्यांच्या मनात वाईट विचार येतात आणि त्या कुटुंबाच्या विरोधात काम करतात, आणि त्यांच्या घरच्या आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते.
टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही