सर्वसामान्यांसाठी Good News! आता गौरी गणपतीचा सण होणार गोड; १ कोटींहून अधिकांना मिळणार’आनंदाचा शिधा’

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुढी पाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी पाठोपाठ आता येत्या गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर तेल या चार वस्तूंच्या समावेश असलेला संच आता ‘आनंदाचा शिधा’ म्हणून अवघ्या शंभर रुपयांमध्ये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरदरम्यान ही शिधा वितरित करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला असला तरी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या जिल्हा प्रशासनातील विभागाकडे अद्याप याबाबत काही सूचना आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना, तसेच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांसह राज्यातील एक कोटी ७० लाख ८२ हजार ८६ इतक्या शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा गौरी-गणपतीच्या सणासाठी पाठविण्यात येणार आहे.त्यास राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने मान्यता दिली आहे.

गौरी गणपती उत्सवानिमित्ताने एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा संच असलेला आनंदाचा शिधा हा वितरीत करण्यात येणार आहे. हा संच अवघ्या शंभर रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान हा आनंदाचा शिधाचे वितरण कऱण्यात येणार असून ई-पॉस प्रणालीद्वारे त्याचे वितरण केले जाणार आहे. प्रतिशिधापत्रिका एका जिन्नसाच्या संचाची खरेदीसाठी ५६३ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास सरकारने मान्यता दिली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, गौरी गणपतीसाठी आनंदाचा शिधा वितरण करण्याचे सरकारने आदेश जारी केले आहेत. मात्र, अद्याप सरकारने वितरणाच्या कोणत्याही सूचना दिल्या नाही तसेच त्याचा साठा अद्याप उपलब्ध करण्यात आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Union Budget 2024-25: बिहार, आंध्रला रिटर्न गिफ्ट, हिमाचलवरही माणिकमोती; बजेटमधून महाराष्ट्राला किती?
१ कोटी ८२ हजार ८६
‘आनंदाचा शिधा’ मिळणाऱ्या शिधापत्रिकांची संख्या

५६३.५१ कोटी रुपये
योजनेसाठी सरकारकडून होणारा खर्च

‘आनंदाचा शिधा ‘मध्ये मिळणारे पदार्थ

एक किलो रवा
एक किलो हरभरा डाळ
एक साखर
एक लिटर सोयाबीन तेल

Source link

Anandacha Shidha Schememaharashtra govtअंत्योदय अन्न योजनाआनंदाचा शिधागणेशोत्सव २०२४गौरी गणपती उत्सव २०२४पुणे बातम्याप्राधान्य कुटुंब शिधापत्रिका
Comments (0)
Add Comment