Raigad Murder: चेहऱ्याचा अक्षरश: चेंदामेंदा, मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत; प्रेम प्रकरणातून तरुणीची निर्घृण हत्या

अमुलकुमार जैन, रायगड : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रायगड जिल्ह्यातील उरण येथील एन.आय.स्कूलजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्कूलजवळ राहणारी २२ वर्षीय तरुणी यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी उरण शहरसहित तालुका हादरून गेला आहे. सदर घटनेनंतर उरण पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपी हा मुस्लिम असून तो बंगलोर या ठिकाणी गेला असल्याचे तपासात समजले आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.मयत यशश्री शिंदे तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघड आहे. यशश्री शिंदे या तरूणीच्या हत्येची माहिती आज पहाटेच्या सुमारास उरण पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मुतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी नेण्यात आला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी यशश्री शिंदे ही २५ जुलैपासून बेपत्ता असल्याची माहिती दिली. पोलीस या आरोपीला लवकरच लवकर ताब्यात घेणार असून नागरिकांनी पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Source link

raigad crime newsraigad girl murderraigad ni school girl killedरायगड एनआय स्कूल तरुणीची हत्यारायगड क्राइम बातम्यारायगड तरुणीची हत्या
Comments (0)
Add Comment