लाडक्या आजी-आजोबांसाठी सरकारची खास योजना; मिळणार ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, काय आहे योजना?

नाशिक : सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदीन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी लागणारी साधने खरेदीसाठी तसेच त्यांना येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयाचे एकरकमी पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी वर्ष २०२४-२०२५ कालावधीसाठी ऑफलाइन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरु आहे. योजना का आणि कशासाठी? पात्रता आणि निकष काय? आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज कुठे करायचा ? जाणून घ्या A टू Z माहिती…

योजना का आणि कशासाठी?

– राज्यात ६५ वर्षे व त्या अधिक वयाची लोकसंख्येच्या १० ते १२ टक्के इतके
– त्यांना दैनंदिन जीवनामध्ये लागणारी आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिले जाणार
– चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कंबरेचा पट्टा, स्टीक व्हिलचेअर, सर्वाइकल कॉलर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, श्रवणयंत्र आदी साहित्याचा समावेश

पात्रता आणि निकष

– अर्जदार लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व नागरिक असावे
– त्यांनी डिसेंबर २०२३ पर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली असावी
– वय ६५ वर्षे व त्यापेक्षा अधिक असणारे नागरिक पात्र ठरणार
– अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असावे
-जिल्ह्यात तीस टक्के लाभार्थी या महिला असतील
Ladki Bahin योजनेतील नियमांबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय, महिलांना दिलासा, वाचा सविस्तर…
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे

– आधारकार्ड
– मतदान कार्ड
– राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
– पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
– उत्पन्नाचा दाखला
– स्वयंघोषणापत्र
– ओळखपत्रासाठी असणारी अन्य कागदपत्रे

अर्ज कुठे करायचा ?

– सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नासर्डी पूलाजवळ, नाशिक-पुणे रोड, नाशिक – ४२२००१
– महापालिका व जिल्हा रुग्णालयातही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे

Source link

cm vayoshri yojanagovt schemesmaharashtra govtscheme for senior citizenनाशिक बातम्यामुख्यमंत्री वयोश्री योजनासामाजिक न्याय विभागसामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग
Comments (0)
Add Comment