मराठा ओबीसी संघर्षात शरद पवारांची भूमिका स्पष्ट; म्हणाले, समाजात संवादाचा अभाव, संसदेचं अधिवेशन संपताच आधी ‘हे’ करणार

मुंबई : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. तर ओबीसीतून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. यामुळे मराठा-ओबीसी संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र आहे. यातच अलीकडे छगन भुजबळांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली होती आणि या आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली होती. तसेच मराठा समाजानेही शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करावे अशी मागणी केली होती. यानंतर आता खुद्द शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली आहे.

शरद पवारांनी एबीपी माझाच्या ‘माझा महाकट्टा’ या कार्यक्रमात आरक्षण प्रश्नावर बोलताना भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘जालना, बीड या शहरांत प्रचंड अस्वस्थता आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यावर मी या जिल्ह्यांचा दौरा करणार आहे आणि तेथील लोकांशी संवाद साधणार आहे. कटुता, अविश्वासाचं चित्र निर्माण झालंय हे भयावह आहे. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे.’ हे अधोरेखित करत त्यांनी ‘लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे आणि यासाठी लोकांनी आमच्यासारख्या नेत्यांनी जीव ओतून काम केलं पाहिजे,’ अशी गरज बोलून दाखवली आहे.
Supriya Sule : बाळासाहेबांनी स्थळ आणलं, सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा
दोन समाजामध्ये वाढत चाललेल्या संघर्षावर टिप्पणी करत पवार पुढे म्हणाले, ‘मुळात संवाद ठेवायला पाहिजे. आज तोच संपलेला आहे. सार्वजनिक जीवनात जेव्हा संवाद थांबतो, तेव्हा चुकीच्या समजुती वाढतात. त्यामुळे संवाद गरजेचाच आहे आणि यासाठी आमच्यासारख्या लोकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत.’
Sharad Pawar : मला भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार म्हणतात, स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले, शरद पवारांचे बाण
दोन समाजात पडत चाललेल्या दरीकडे लक्ष वेधत ते म्हणाले, ‘गंमत अशी आहे की दुर्दैवाने दोन वेगवेगळे वर्ग पडले आहेत. त्या दोन वर्गांना कोणी-कोणी काय तरी सांगितलं आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी दोन्ही बाजू घेतलेल्या आहे. एका गटाने ओबीसींची बाजू घेतली आहे. तर दुसरा गट मराठा आंदोलकांच्या बाजूने आहे. बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण सामंजस्य कसं निर्माण कसं करू यावर अधिक लक्ष देणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे संवाद वाढवणं गरजेचं आहे,’ आणि केंद्र सरकारने या प्रकरणात अजिबत लक्ष घातलेलं नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे.

Source link

Chhagan Bhujbal on OBCjarange patilMaratha ReservationNCP SP ChiefSharad Pawarओबीसी आरक्षणछगन भुजबळमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणशरद पवार
Comments (0)
Add Comment