राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देताच पुण्यातून पहिला आवाज, WhatsApp स्टेटसमधून मतदारसंघावर दावा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर पुण्यातून हालचाली वाढल्या आहत. मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी थेट मतदारसंघावर दावा ठोकला आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर साईनाथ बाबर यांनी दावा सांगितला आहे.

वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडल्यानंतर हडपसर मतदारसंघामधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तयारी सुरु केली.

वसंत मोरेंशी टोकाचे वाद

साईनाथ बाबर आणि वसंत मोरे हे एकमेकांचे जिगरी दोस्त होते. परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात ३६ चा आकडा झाला होता. लोकसभा निवडणुकांपूर्वी बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. साईनाथ दिल्लीला गेला, तर दुधात साखर पडेल अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनीही पुणे लोकसभेची उमेदवारी हवी होती, त्यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे गळ घातली होती. परंतु मनसेने लोकसभेआधीच तलवार म्यान केल्यामुळे मोरेंनी पक्षाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर पुणे लोकसभा लढले. पदरी अपयश आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
Babajani Durrani : अजितदादांना धक्का, बाबाजानी दुर्रानी यांचा रामराम, शरद पवार गटात प्रवेश
राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांची पुणे शहराध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर त्यांचेच जवळचे मित्र साईनाथ बाबर यांना जबाबदारी दिली होती. त्यामुळे पक्षातून आपल्याच जवळच्या मित्राने आपला पाय खेचल्याची भावना वसंत मोरे यांच्या मनात त्यावेळेस निर्माण झाली होती.
Supriya Sule : बाळासाहेबांनी स्थळ आणलं, सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? शरद पवारांनी सांगितला भन्नाट किस्सा

हडपसर विधानसभेत बहुरंगी लढत

एकीकडे, साईनाथ बाबर हडपसर विधानसभेला मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. मनसे स्वबळावर लढणार असल्याने रस्सीखेच होण्याची शक्यता कमी आहे. त्याचवेळी हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला सुटतो हे महत्त्वाचं आहे. या मतदारसंघावर अनेकांचा डोळा आहे. त्यामुळे हडपसरमध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Source link

Maharashtra politicsraj thackerayVidhan Sabha Electionमहाराष्ट्र नवनिर्माण सेनावसंत मोरेसाईनाथ बाबरहडपसर विधानसभा
Comments (0)
Add Comment