Vidhan Sabha Election : ‘त्या’ जागांवरुन युतीत रस्सीखेच, निवडणुकांआधीच पेच, नेत्यांची डोकेदुखी वाढली

कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. खासदार नारायण राणे यांनी भाजपने थेट राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांवर लढलं पाहिजे, असं म्हटलं आहे.यावरच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया देताना सांगितले.नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांचे मत मांडलेल आहे. हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही. हे मत माननीय नड्डा साहेबांचा नाही.हे मत माननीय अमित शहा साहेबांचा नाही आहे. हे मत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे. महायुतीमध्ये जर भाजप जर २८८ जागा लढणार तर महायुती कशाला आहे.प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाची ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील, असे म्हस्के म्हणाले..

तर दुसरीकडे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे दोन खासदार निवडून आल्याने शिवसेना शिंदे गटाने दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे.भाजपने कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि अंबरनाथ मतदारसंघावर दावा केला आहे.
Vidhan Sabha : शरद पवारांचा विश्वासू नेता नांदेडमध्ये, ५ जागांवर दावा सांगितला, काँग्रेस टेन्शनमध्ये

विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय वरिष्ठ घेतील, त्याप्रमाणे उमेदवार निवडून आणू,बंडखोरी होणार नाही. कल्याण पूर्वेत भाजपचा उमेदवार पाहिजे, अशी आमची मागणी असून त्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.. तसेच सूर्यवंशी यांनी सांगितले की, ‘कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि अंबरनाथ या विधानसभा मतदारसंघाकरीता तयारी सुरु आहे. आम्ही या मतदारसंघावर दावा करणार आहोत. भाजपचा उमेदवार असेल तर शंभर टक्के निवडून येणार. मित्र पक्षाचा उमेदवार आला तरी आम्ही मदत करणार. मात्र या पाचही विधानसभा मतदारसंघावर आमचा दावा आहे. वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यावर अवलंबून आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावा लागेल’.
Narayan Rane: भाजपनं सगळ्या २८८ जागांवर…; नारायण राणेंच्या विधानानं वाढवलं शिंदेसेना, दादा गटाचं टेन्शन

यावरच प्रतिक्रिया देत आता ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी भाजपला टोला हाणला आहे, थरवळ म्हणाले की माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं भाजपची परिस्थिती आहे आणि त्यांची नीती आहे त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. कारण आत्ताच लोकसभेबरोबर दोन राज्याच्या विधानसभा झाल्या. एक ओरिसा एक आंध्र प्रदेश ज्या पक्षांनी मागच्या काळात त्यांना संभाळले, त्या दोन्ही पक्षांना या विधानसभेमध्ये संपून टाकले, भाजपची ही निती आहे, मित्र पक्षाला बरोबर घ्यायचं गरजेपुरतं आणि नंतर संपवायचं, असे सांगत भाजपला टोला हाणला आहे.

यावरच शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली असून युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच आमच्याकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे लोकसभेतील निकाल बघता त्यांना लोकसभेमध्ये जो लीड मिळाला आहे, तो निर्णय आल्यानंतर आमच्या देखील पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या मागण्या आहेत की ज्या सीट अनेक वर्ष भाजपा लढते आहे. त्या सेनेला मिळाव्या आणि भाजपच्या काही सीटवर शिवसेनेने लढावे अशी आमच्याही लोकांची इच्छा आहे. हा सर्व निर्णय आमचे वरिष्ठ पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे हे घेतील. परंतु आता आम्ही युतीमध्ये लढतो आणि युतीमध्ये वाटाघाटी मध्ये ज्या जागा ज्या पक्षाला लढायला मिळतील त्यांनी त्या लढाव्या. आता या सीटवर आम्हाला लढायचे आहे, त्या सीटवर पण आम्हाला लढायचे आहे. तसा दावा आम्हाला देखील करता येतो परंतु युतीमध्ये असे दावे प्रतिदावे करणे मला वाटत नाही संयुक्तिक ठरेल, असे म्हात्रे यांनी सांगितले.. त्यामुळे येत्या काळात या पाचही विधानसभेच्या जागा कोण लढवत हे पहावे लागेल.

Source link

shivsena and bjpVidhan Sabha Electionvidhan sabha newsvidhan sabha seatकल्याणठाणेमहायुतीविधानसभा जागावाटपविधानसभा निवडणुक
Comments (0)
Add Comment