Navnath Waghmare On Jarange : पाचवी नापास जरांगेंना आरक्षण कळत नाही, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचा हल्लाबोल

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचा आधार आणि जनतेचा जनाधार संपल्यामुळे जरांगे यांनी उपोषण सोडलं. असं ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी म्हंटलं आहे. आज ( 27 जुलै ) जालन्यात पत्रकार परिषद घेऊन नवनाथ वाघमारे यांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट द्यावं अशी आरक्षणाची मागणी केली आहे. परंतु या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी अशी वैचारिक लढाई सुरू झाली आहे.

आंदोलनाला मुख्यमंत्र्यांची रसद

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या आंदोलनावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहे. ते म्हणाले की, ”जरांगे यांच्या आंदोलनाला मुख्यमंत्र्यांनी रसद पुरवली होती. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी राज्य सरकारला मुदत वाढवून दिली आहे. नवनाथ ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढल्यानंतर वाघमारे बोलत होते.
Manoj Jarange Patil : मला जेलमध्ये टाकून कैद्यांकडून मारण्याचा कट: मनोज जरांगे

पाचवी नापास जरांगेला आरक्षण कळत नाही

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी पाचवी नापास जरांगे यांना आरक्षण कळत नाही. तसेच शिवराळ भाषा वापरल्यामुळे मराठा समाजाचा अपमान होत आहे. असं म्हणत जरांगे यांच्यावर टीका केली आहे. तब्येतीचं कारण देऊन जरांगे यांनी उपोषणास स्थगिती दिली आहे. त्यामुळे जरांगे यांच्यावर राजकीय वर्तुळातून सुद्धा मोठ्याप्रमाणात टीका होत आहे.

जरांगे यांच्याविरोधात अटक वॉरंट

मनोज जरांगे यांच्या विरोधात पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याच्या फसवणुकीप्रकरणी पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. ज्या न्यायाधीशांनी माझ्याविरोधात अटक वॉरंट जारी केले, ते उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे पाहुणे असल्याची माझी ऐकीव माहिती आहे. मला तुरुंगातून टाकून तेथील कैद्यांच्या हातून मला मारण्याचा कट असल्याचा सनसनाटी आरोप जरांगे यांनी केला. गृहखाते आणि विधी व न्याय खाते फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांचे ऐकणे अधिकाऱ्यांना भाग आहे. हा सगळा डाव देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला आहे, असे एकामागून एक आरोप जरांगे यांनी केले.

Source link

jarange patilmanoj jarangemanoj jarange patilMaratha ReservationNavnath Waghmare On Jarangeनवनाथ वाघमारे यांची मनोज जरांगे यांच्यावर टीकामनोज जरांगेमनोज जरांगे उपोषणमनोज जरांगे बातमी
Comments (0)
Add Comment