यासह कापूस आणि सोयाबीन यांना योग्य हमीभाव वाढवून मिळावा असे सुद्धा सीएम शिंदेंनी बैठकीत म्हणाले. हंगामाच्या सुरुवातीपासूनच सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना पीएम मोदीच न्याय देऊ शकतात त्यामुळे लवकरच यावर तोडगा मोदी काढतील असा विश्वास शिंदेंनी बोलून दाखवला.
पायाभूत सुविधांची मागणी
नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती सीएम शिंदे यांनी केंद्राकडे केली आहे. यासह नाशिक- पुणे रेल्वेमार्गाच्या कामाला तातडीने सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पायाभूत सुविधांवर बोलताना, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोकण कोस्टल रोड आणि कोकण ग्रीन फील्ड एक्स्प्रेसवे प्रमाणे जे कोकणासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.
यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यसरकार सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे आणि कोकणात दरवर्षी १६७ टीएमसी वाहून जाणारे पाणी अडवून, मराठवाड्यातील गोदावरीच्या खोऱ्यात आणून इथल्या भागातील लोकांना ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत यासाठी केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती सीएम शिंदेंनी केली आहे.