Sharad Pawar: तेव्हा व्यक्तीचे दुःख,व्यथा अशा शब्दांमधून बाहेर येतात; मुनगंटीवारांनी शरद पवारांना फटकारले

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट (एनसीपी-एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ज्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केले ते देशाचे गृहमंत्री म्हणून बसले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर पर्यावरण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. मुनगंटीवार म्हणाले, पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहणारा नेता जेव्हा देशाचा गृहमंत्रीही होऊ शकत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या दुःख आणि व्यथा अशा शब्दांमधून बाहेर येत राहतात.

मुनगंटीवार यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भाजप नेते म्हणाले, “जेव्हा जनता एखाद्या नेत्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देत नाही. आणि त्याचा स्वप्नाला तडीपार केले जाते. माननीय साहेब पंतप्रधान बनणार , माननीय साहेब पंतप्रधान बनणार. पंतप्रधान होण्याचे तर सोडा. हे देशाचे गृहमंत्रीही होऊ शकले नाहीत, याचे दु:ख आणि वेदना इतरांचा अनादर करण्याच्या शब्दात व्यक्त होत आहेत.
Freestyle Fight: खासदाराचा ड्रायव्हर आणि आमदार पुत्राच्या ड्रायव्हरांमध्ये फ्री स्टाईल कपडे फाटेपर्यंत हाणामारी, पाहा व्हायरल Video

ते पुढे म्हणाले की, ” सात जागांच्या भरवश्यावर आपण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नेते होतो. सात खासदारांवर भरवश्यावर नेता होण्याचा प्रयत्न केला असता, या प्रयत्नात त्यांना यश मिळत नाही. मग एखाद्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या नेत्याबाबत असे वक्तव्य करणे नैतिकता नाही आहे.
Bombay High Court: ‘ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?’ उच्च न्यायालयाचा संताप; पोलिसांच्या कृतीवर तीव्र ताशेरे

मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका

राज्य सरकारशी ऑनलाइन थेट चर्चेची मागणी पवार यांनी केली. पवारांच्या मागणीवर मुनगंटीवार म्हणाले, “सरकारने थेट चर्चा करण्यापूर्वी तुमची भूमिका काय आहे ते सांगा. तुमची भूमिका मराठा आरक्षण देण्याची नव्हती, आता तुमची भूमिका बदलली तर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला सांगायला पाहिजे. स्वतंत्र आरक्षण द्यायचे की ओबीसींना आरक्षण द्यायचे. जर त्यांचा खरा चेहरा समोर आल्यास महाविकास आघाडी अडचणीत येईल. मुनगंटीवार यांच्या प्रमाणे गिरीश महाजन यांनी देखील मराठा आरक्षणावरुन पवारांवर टीका केली. मराठा आरक्षणावर पवारांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी लातूर येथे बोलताना केला.

Source link

Maharashtra politicsmaharashtra politics latest newsmaharashtra politics newssudhir mungantiwar on sharad pawarगृहमंत्री अमित शहाराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशरद पवारसुधीर मुनगंटीवार
Comments (0)
Add Comment