पायात साखळी, झाडाला बांधलेलं, विदेश महिलेसोबत सिंधुदुर्गात धक्कादायक प्रकार; काय प्रकरण

प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील एका घनदाट जंगलात विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जंगलात विदेशी महिला का गेली होती? तिकडे तिला झाडाला कोणी बांधली असेल? असा प्रश्न नागरिक आणि पोलिसांना पडला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Atal Setu News : अटल सेतूवर कार थांबवली, गाडीतून उतरला, आजूबाजूला कुठेही न पाहता थेट समुद्रात उडी; तरुणाने आयुष्य संपवलं
मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल या घनदाट जंगलात विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विदेशी महिला या जगलात का आली? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. रोणापाल गावातील काही गुराखी नेहमीप्रमाणे आपली गुरं चारण्यासाठी जंगलातील काही भागांमध्ये घेऊन गेले होते. तिथे त्या गुरख्यांना एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत शनिवारी सकाळी दिसली. त्यानंतर गुराख्यांनी याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. झाडाला बांधलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला सोडून नंतर तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Raigad News : ३५० फूट खोल दरीत कोसळूनही जीवंत होती, रुग्णालयात नेलं, पण… रिल स्टारचा दरीत कोसळून अंत
या विदेशी महिलेच्या उजव्या पायाला साखळदंड घालून झाडाच्या बुंध्याला बांधून, कुलूप लावून बंद करण्यात आलं होतं. ती महिला गेले तीन दिवस अशाच अवस्थेत होती. सतत तीन दिवस उपाशी राहिल्यामुळे तिची प्रकृती खालावली होती. उपाशी राहिल्याने महिला बोलण्याच्या स्थितीत नव्हती. रोनापाल या जंगलात गुरं चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांना महिलेचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने जात, जवळून पाहिल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
Jalgaon News : चार मुली मेसवर जेवणासाठी थांबल्या, मालकाला संशय; पोलिसांना कॉल केला आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा असा धक्कादायक प्रकार विदेशी महिलेच्या पतीकडून केला गेला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत या महिलेवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

ती महिला नीट बोलत नसल्यामुळे परिपूर्ण माहिती पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे पोलीस तपासात अडथळा निर्माण होत आहे. मात्र महिलेकडे सापडलेल्या कागदपत्रांवरुन या महिलेचे नाव ललिता कायी कुमार असं असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र अद्याप संपूर्ण प्रकरण समोर आलं नसून या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.

Source link

foreigner woman in sindhudurgforeigner woman tied to tree in sindhudurg forestratnagiri sindhudurgsindhudurg newsअमेरिकन महिला सिंधुदुर्गातील जंगलातसिंधुदुर्ग जंगलात विदेशी महिलासिंधुदुर्ग बातमीसिंधुदुर्गात विदेशी महिला झाडाला बांधलेली
Comments (0)
Add Comment