नागपूर : पती, पत्नी आणि मेहुणा या तिघांमध्ये वाद सुरू होता. त्यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला आपला जीव गमावावा लागला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिघांचा वाद सोडवण्याच्या उद्देशाने गेलेल्या तरुणावर या भांडणातील एका संतप्त तरुणाने चाकूने गळ्यावर वार करून तरुणाची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येर खेड्यातील गणेश ले-आउट येथे घडली.
पंकज नाथूलाल सोलंकी, वय ३८, असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी महेश जीवनलाल उके, वय ३२ याला अटक केली आहे. भांडणात मृत्यू झालेला पंकज हा मजूर आहे. तर मारेकरी महेश हा भंगारचा व्यवसाय करतो. मृत पंकज गणेश ले-आउटमधील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहतो. तर महेश हा तिथेच पहिल्या मजल्यावर कुटुंबासह भाड्याने राहतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास मारेकरी महेश आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद सुरू झाला. वाद सोडवण्यासाठी महेशचा मेहुणा आला. महेशने शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. महेशने हातात चाकू घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न सुरू केला. याचदरम्यान महेशची पत्नी आणि मुलाने आरडाओरड करत रडायला सुरुवात केली.
भांडणाच्या आवाजाने दुसऱ्या मजल्यावर राहणारा पंकज हा महेशच्या घरी गेला.‘आपस मे झगडा क्यू कर रहे हो’,असं पंकज महेशला म्हणाला. महेश संतापला. त्याने तुझे क्या करना हैं असं म्हणत पंकजच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. पंकज रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. पंकजचे नातेवाइक महेशच्या घरी आले. त्यांनी जखमी पंकजला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून पंकजला मृत घोषित केलं. नवीन कामठी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी महेशला अटक केली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून नागपूरमध्ये हत्येच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आठवडाभरापूर्वी रेल्वे रुळावर विकृत अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात होती होती.