Mahayuti Seat Allocation : आजच होणार फैसला! महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार? दिल्लीत अमित शाहांबरोबर शिंदे,फडणवीस,अजित पवारांची बैठक

मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. जागावाटप कसं केलं जाईल? कोणत्या मतदार संघात कोणता उमेदवार दिला जाईल. याबद्दल फक्त जनतेलाच नव्हे तर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच आज ( 27 जुलै) राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्ली वारीवर आहेत. केंद्रीय मंत्री भाजपचे नेते अमित शाह यांची आज भेट घेत जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार आहे. त्याच बरोबरच महायुतीच्या जागावाटपाबाबत आजच अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच दिल्लीत पोहोचले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. अमित शाह यांच्यासमवेत तिन्ही नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे कार्यकर्त्यांसह जनतेचे देखील लक्ष असणार आहे.

एकनाथ शिंदे, अजित पवारांच्या मागण्या काय ?

शिंदे गटासह अजित पवार गट हा आगामी विधानसभेसाठी 80 हून अधिक जागा लढवण्यास इच्छूक आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा झालेला पराभवामुळे जास्तीत जास्त जागा लढवण्याचा अजित पवार गटाचा मानस आहे. तर शिंदे गटाने देखील आपली लोकसभा निवडणुकीतील खदखद बोलावून दाखवली आहे. त्यामुळे शिंदे गट देखील 80 हून अधिक जागा लढवण्यास इच्छूक आहे. सद्यस्थिती भाजपचे 104 आमदार आहेत त्यामुळे आगामी विधानसभेत जास्तीत जास्त जागा देणे हा भाजपचा प्रयत्न असणार आहे. परंतु आता अजित पावर गट आणि शिंदे मिळून 160 हून अधिक जागांची मागणी करत आहे. त्यामुळे आता तिढा भाजप कशापद्धतीने सोडवतोयं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

दरम्यान, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महायुतीसह महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत चांगलीच कंबर कसताना दिसणार आहे.

Source link

assembly election 2024maharashtra assembly electionmaharashtra assembly election 2024mahayutimahayuti seat allocationMH Assembly Electionमहायुतीमहायुती जागावाटपमहायुती जागावाटप सूत्र
Comments (0)
Add Comment