सोलापूर: ओबीसींचे १०० आमदार विधानसभेत जायला हवे आहेत. १०० आमदार जर विधानसभेत गेले तर कोणताही ठराव ओबीसींच्या विरोधात मंजूर होत नाही हे लक्षात घ्या. ही लढाई राजकीय लढाई आहे. भारतीय जनता पक्षाने जर ओबीसींची बाजू घेतली आणि मनोज जरांगेनी भाजपवर टीका केली तर मी समजू शकतो की, हे भांडण आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली नाही. तरीही मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. राजकारण लक्षात घ्या. यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रकाश आंबेडकर आज सोलापुरात बोलत होते. वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेचे जोरदार स्वागत पंढरपूर येथे करण्यात आले. आरक्षण बचाव यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरात ही यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. अनेक ओबीसी संघटना आणि संघटनांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. तसेच या यात्रेला सगळीकडे मोठा प्रतिसाद मिळत आहे.ओबीसींनी राजकीय चेहरा दाखवला नाही, तर आरक्षण वाचणार नाही. ज्या दिवशी आपण आपला राजकीय चेहरा दाखवू, तेव्हाच आपण आरक्षण टिकवू. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूर येथील सभेत व्यक्त केले आहे. मिळालेले अधिकार टिकवणे जसे महत्वाचे आहे, तसे ओबीसी म्हणून ओळख टिकवणे हे सुद्धा महत्वाचे असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरही टीका केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, एससी आणि एसटीप्रमाणे ओबीसींचे आरक्षण संविधानिक असावं अस मला वाटत होतं. त्यासाठी ओबीसींची सूची ही घटनेचा अंतर्भाग करायची होती. त्यावेळचे दोन पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप यांच्याशी बोलण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्यात आल्या. त्यातील काँग्रेससोबत बोलण्यासाठीच्या समितीत मी सुद्धा होतो. तेव्हा काँग्रेसवाल्यांना मी म्हणालो की, हे झालं पाहिजे तेव्हा काँग्रेसने सरळ सांगितले की, आम्हाला यामध्ये रस नाही.