Nashik Dengue Cases: नाशिक बनलंय डेंग्यूचे हॉटस्पॉट; २५ दिवसांत ‘इतक्या’ रुग्णांची नोंद, प्रशासन अलर्ट मोडवर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरासह जिल्ह्यातील डेंग्यूची छाया अतिगडद होत असताना उशिराने कीट प्राप्त झाल्यानंतर दोन दिवसांत साडेपाचशेहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे, जुलैच्या पंचवीस दिवसांत जिल्ह्यात सुमारे २९५, तर नाशिक शहरात २५४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून, २९३ रुग्ण बरे झाले आहेत.

आरोग्य उपसंचालकांच्या शुक्रवारच्या (दि. २७) आदेशान्वये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली डेंग्यू आढावा बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आवेश पलोड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस. पिळगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, जिल्हा सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. प्रशांत गांगुर्डे व जिल्हा साथरोगतज्ज्ञ डॉ. राहुल हडपे उपस्थित होते.

विभाग – संशयित रुग्ण – पॉझिटिव्ह – बरे झालेले – मृत

नाशिक ग्रामीण – ३१६ – ३४ – ३३ – १
नाशिक महापालिका – १,०१४ – २५४ – २५३ – १
मालेगाव – ३१ – ३ – ३ – ०
इतर जिल्हा – २५ – ४ – ४ – ०
एकूण – १,३८६ – २९५ – २९३ – २
Mobile Medical Unit: फिरता दवाखाना फिरेना! ४० वाहने वापराविना पडून; राज्यात २० जिल्ह्यांत आरोग्यसेवा ठप्प
बैठकीतले निर्णय असे…

– राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान पुणेमार्फत पंधरा कीट प्राप्त झाले. त्यानुसार अंदाजे तेराशे डेंग्यू चाचण्या शक्य आहेत. एका कीटमध्ये नव्वद चाचण्या होतात. त्यानुसार २६ जुलै सायंकाळपर्यंत ५६० चाचण्या पूर्ण

– राज्यस्तरावरून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत कीट येतात. महापालिका क्षेत्रासाठी महापालिकेतील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कीट प्राप्त करण्याचे प्रयत्न करावेत

– खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत थेट डेंग्यू चाचणीचे नमुने पाठवू नयेत, राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेच्या यंत्रणांद्वारे जिल्हा प्रयोगशाळेत पाठवावेत

– सद्यस्थितीत जिल्हा प्राधान्य प्रयोगशाळेत रिक्त सूक्ष्मजीवशास्त्रज्ञपदाचा अतिरिक्त कार्यभार मालेगाव येथील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांकडे सोपविला

जिल्हा रुग्णालयात ५७ डेंग्यूबाधित रुग्ण होते. त्या सर्वांची घरी सुटी करण्यात आली आहे. डेंग्यू रॅपिड आयजीएम व रॅपिड एनएस वन चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णावर त्वरित उपचार होतात. त्यामुळे डेंग्यू ‘आयजीएम एलिसा’चा अहवाल येईपर्यंत उपचार झालेले असतात.– डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक

Source link

nashik dengue casesnashik dengue deathnashik dengue hotspotnashik dengue updateडेंग्यूची लक्षणे कारणे व उपायनाशिक बातम्यानाशिक महानगरपालिका
Comments (0)
Add Comment