अडचणी इथल्या संपत नाही! जखमी बापासाठी लेकाने केली खाटेची कावड, रुग्णालय गाठण्यासाठी १८ किमीची पायपीट

गडचिरोली : गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अजूनही मुलभूत सुविधांची वाणवा असल्याचे चित्र वारंवार प्रकर्षाने समोर येत आहे.जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने रस्त्यांचीही दैना झाली आहे. त्यामुळे या अतिदुर्गम भागातील लोकांना वैद्यकीय उपचारांसाठी पायपीट करत रुग्णालय गाठावे लागत आहे. गर्भवती महिलांनाही प्रसुती काळात वेळेत रुग्णालयात दाखल करता येत नसल्याने हाल सोसावे लागत आहेत. यातच नागरिकांच्या गैरसोयीचे आणखी एक विदारक चित्र समोर आले आहे.

शेतीकाम करताना घसरुन पडल्याने जखमी झालेल्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल १८ किलोमीटर पायपीट केली. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, पण पितृप्रेमही ओसंडून वाहत होते. मुलाने नावेतून नदी पार केल्यानंतर आपल्या पित्याला रुग्णालयात भरती केले. मालू केये मज्जी (६७, रा. भटपार ता. भामरागड) असे जखमी पित्याचे नाव आहे.
पाच दिवस बत्ती गुल, वीज वितरण विभागाचा गर्भवतींना ‘शॉक’, मोबाईल टॉर्चवर प्रसुतीची वेळ
जिल्ह्यात गेला आठवडाभर मुसळधार पाऊस सुरु आहे. याचा फटका भामरागडला बसला आहे. परिणामी पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने भामरागडाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. मालू मज्जी हे २६ जुलै रोजी नित्याप्रमाणे शेतात गेले असता चिखलात त्यांचा पाय घसरला आणि त्यांच्या पायाला मार बसला. यात त्यांना तीव्र वेदना होत होत्या. यामुळे त्यांचे चालणे आणि फिरणेही कठीण झाले.

वेदनेने विव्हळणाऱ्या पित्याला रुग्णालयात नेण्यासाठी भटपारपासून १८ किमी अंतरावरील भामरागडला जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. वाहनही नव्हते त्यामुळे चिखलात पायपीट करणे हाच एकच पर्याय होता. त्यामुळे त्यांचा मुलगा पुसू मालू मज्जी याने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड केली व मालू यांना त्यावर झोपवून भामरागडच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी पाय फ्रैक्चर असल्याचे निदान केले.
Gadchiroli Rain: गडचिरोलीत पावसाचा हाहाकार; ११ मार्गांवरील वाहतूक ठप्प, शंभराहून अधिक गावांचा संपर्क तुटला
मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि त्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आहे. हे ऐकताच उपचारानंतर पुसू मज्जी याने आपल्या वडिलांना घेऊन पुन्हा खाटेची कावड करुन भटपार येथेील स्वगृही परतला.

Source link

gadchiroli newsincreasing problems in remote areaslack of medical emergency facilitymaharashtra sarkarRemote Areas in maharashtraगडचिरोतील विदारक चित्रदुर्गम भागातील लोकांची व्यथामहाराष्ट्रातील अतिदुर्गम भागमुलभूत सुविधांची वाणवावैद्यकीय उपचाराचे तीनतेरा
Comments (0)
Add Comment