अजित पवार यांना धक्का, बाबाजानी दुर्रानी यांचा रामराम, शरद पवार गटात प्रवेश

धनाजी चव्हाण, परभणी/छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजितदादा गटातील माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. विधान परिषदेवरील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे.

“आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी भवन संभाजीनगर येथे पवार साहेबांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षात माझा प्रवेश होणार आहे.” असं दुर्रानी यांनी सांगितलं.

जयंत पाटील यांच्याशी चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात बाबाजानी दुर्रानी यांच्या पाथरी येथील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्यामुळे तेव्हापासूनच दुर्रानी पक्षांतर करणार असल्यांच्या चर्चांना उधाण आलं होतं.

परतीचं कारण काय?

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्रानी अजित पवार यांच्यासोबत गेले होते. निधी मिळवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र वर्षभरात ते दादा गटाबाबत फारसे समाधानी नव्हते. त्यातच मुस्लीम समाजाकडून दुर्रानींवर महाविकास आघाडीत जाण्याबाबत त्यांच्यावर दबाव होता.

कोण आहेत बाबाजानी दुर्रानी?

बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरी नगर परिषद सदस्य म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेकडून तीन वेळा आमदार राहिलेल्या हरीभाऊ लहाने यांचा पराभव करत दुर्रानी जाएंट किलर ठरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बाबाजानींनी २००४ मध्ये पहिल्यांदा परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर २०१२ मध्ये ते परभणी-हिंगोली मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले होते. २०१८ मध्ये ते पुन्हा परिषदेवर बिनविरोध विजयी झाले आणि त्यांची टर्म वाढली.
Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

पाथरीसाठी मोर्चेबांधणी

बाबाजानी दुर्रानी हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास उत्सुक आहेत. शरद पवार गटात प्रवेश करुन त्यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसते.

Source link

ajit pawarMaharashtra politicsSharad Pawarपरभणी राजकीय बातम्याबाबाजानी दुर्रानीविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment