जागावाटप लवकर करा! अजित पवार सर्वाधिक आग्रही; दादांना नेमकी कोणती काळजी?

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला जागावाटपात झालेल्या विलंबाचा फटका बसला. जागांसाठी झालेली रस्सीखेच, उमेदवार जाहीर करण्यास झालेला उशीर, प्रचारासाठी अपुरा पडलेला वेळ यामुळे महायुती पिछाडीवर पडली. लोकसभेवेळी झालेली चूक विधानसभेला टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महायुतीमध्ये सर्वात उशिरा सामील झालेले अजित पवार जागावाटप लवकर करण्यासाठी सर्वाधिक आग्रही असल्याचं समजतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जागावाटपाबद्दल चर्चा केली. लोकसभेला झालेला घोळ विधानसभेवेळी होऊ नये यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. जागावाटपाच्या चर्चेला तिन्ही पक्षांकडून कोण कोण नेते बैठकीला हजर राहतील, त्यांची नावं वर्षावरील बैठकती निश्चित करण्यात आली.
Narayan Rane: भाजपनं सगळ्या २८८ जागांवर…; नारायण राणेंच्या विधानानं वाढवलं शिंदेसेना, दादा गटाचं टेन्शन
जागावाटपाचं सूत्र लवकर निश्चित न झाल्यास आपले आमदार, तगडे उमेदवार विरोधकांच्या गळाला लागू शकतात, अशी भीती महायुतीला आहे. महाविकास आघाडीतील काही आमदारांना महायुतीत येण्याची इच्छा आहे. जागावाटप लवकर झाल्यास त्यांना शब्द देणं सोपं होईल, असा सूर वर्षावरील बैठकीत दिसून आला. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फुटली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील पराभूत झाले. काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. हे आमदार विधानसभेच्या तोंडावर महायुतीत जाऊ शकतात.
Raj Thackeray: लोकसभेला बिनशर्त, विधानसभेला स्वबळ; राज ठाकरे कोणाला डॅमेज करणार? ५ महत्त्वाचे मुद्दे
जागावाटपाचा मुद्दा लवकर निकाली निघावा यासाठी अजित पवार सर्वाधिक आग्रही आहेत. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला. त्यांच्या पक्षाला ४ जागा मिळाल्या. पैकी केवळ एक जागा त्यांना जिंकता आली. विशेष म्हणजे बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं १० पैकी ८ जागा जिंकत दणदणीत कामगिरी केली.

शरद पवारांनी अजित पवारांना लोकसभेला दिलेला शह पाहता दादा गटात चलबिचल सुरु आहे. त्यांचे काही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. काही आमदारांनी विधिमंडळात शरद पवारांचे निकटवर्तीय जयंत पाटलांची भेट घेतली. काका-पुतण्यानं एकत्र यावं असा सूर काही आमदार आळवू लागले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांवर टीका करताच दादांचे आमदार अस्वस्थ झाले. शरद पवारांनी लोकसभेला उमेदवार देताना केलेल्या खेळी पाहता अजित पवार गटाचे आमदार फुटण्याचा धोका आहे. त्यामुळे अजित पवार सावध झाले असून जागावाटप मार्गी लावण्यासाठी सर्वाधिक आग्रही आहेत.

Source link

ajit pawarassembly election 2024bjpmaharashtra assembly election 2024ncpअजित पवारमहायुती जागावाटपविधानसभा जागावाटप महायुतीविधानसभा निवडणूक २०२४शरद पवार
Comments (0)
Add Comment