२. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने जुलै महिन्यात राज्यात ६७ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. या महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांमधील पावसाने राज्यातील पाणीसाठ्यात त्यासोबतच नुकसानामध्येही मोठी भर घातली आहे. या पार्श्वभूमीवर तात्कालिक हवामानापेक्षा वातावरणाचा अभ्यास आणि त्या आधारित उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे.
३. ‘मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सुसंवाद वाढवला पाहिजे. मराठा आंदोलक मनोज जरांगे, ओबीसींचे नेते छगन भुजबळ, प्रा. लक्ष्मण हाके यांना एकत्र आणून त्यांचीशी चर्चा केली पाहिजे. सामुदायिक प्रयत्नातून, समन्वयातून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे’, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राज्य सरकारला दिला. आपल्या पक्षाची भूमिका सुसंवादाची आहे, चर्चेची आहे, असेही पवार म्हणाले.
४. ‘मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी इतरांचे उमेदवार पाडण्याऐवजी विधानसभा निवडणुकीत स्वत:चे उमेदवार विजयी करून सरकार स्थापन करावे. स्वत:च्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या सरकारकडून ज्यांना हवे, त्यांना आरक्षण द्यावे’, असा टोला भाजप नेते आमदार डॉ. परिणय फुके यांनी लगावला आहे.
५. जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळाने नीरा देवघर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या वितरिकेची ९६७.७४ कोटी रुपयांच्या विकासकामांची काढलेली निविदा थंडबस्त्यात गेली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपून दोन महिने होत आले तरी काम सुरू झालेले नाही. हा प्रकल्प रद्द किंवा स्थगित करण्यात आला नसल्याचे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे म्हणणे आहे.
६. ‘लोकसभा निवडणुकीत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, हतबल दिसले. पण हेच पदाधिकारी, कार्यकर्ते मेळावे, बैठकांमध्ये टाळ्या वाजवायला, पुष्पगुच्छ द्यायला पुढे असतात. सभेला हजर राहणे म्हणजे पक्षाचे काम करणे नव्हे. गावात, प्रभागात महायुतीला किती मतदान झाले, याची माहिती काढली तर वस्तुस्थिती समोर येईल. लोकसभेत विरोधक अपप्रचार करत असताना तुम्ही अनुदानाची वाट पाहत होता का?’ अशा शब्दात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
७. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी तणावपूर्ण वातावरणात शनिवारी मतदान झाले. बोगस मतदान, मतदान बूथमध्ये घुसखोरी करणारे उमेदवार, कार्यकर्त्यांची अवास्तव गर्दी आणि गैरप्रकाराच्या आरोपांमुळे मतदानप्रक्रिया गोंधळात पार पडली. या वेळी अखेरच्या टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये मारहाण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यापूर्वीही या संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मारहाणीचे प्रकार झाल्याने मतदानप्रक्रियेवर तणावाचे सावट होते. बातमी वाचा सविस्तर…
८. घरात जेवण करीत असतानाच अचानक आलेल्या बिबट्याने हल्ला करून चौघांना जखमी केले. सावली तालुक्यातील पालेबारसा येथे शनिवारी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. प्रसंगावधान राखत गावकऱ्यांनी हल्लेखोर बिबट्याला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर व वनविभागाला माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू होती. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
९. दिल्लीतील एका प्रसिद्ध कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ओल्ड राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, दिल्ली सरकारने या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत.
१०. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज कपूर यांनी ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाच्या शूटिंगमधील एक भयानक घटना शेअर केली आहे. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ चे शूटिंग चालू होते. हे शूट एका कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी ओपन लिफ्टमध्ये केले जात होते जे की खूपच रिस्कीसुद्धा होते. त्यावेळी एक असा क्षण आलेला जेव्हा तब्बल २५ लोकांचा जीव दावणीवर लागलेला. कारण आम्ही ज्या लिफ्टमधून २६ व्या माळ्यावरुन खाली येत होतो तेव्हा ती लिफ्ट मध्येच अचानक बंद पडली. बातमी वाचा सविस्तर…