पुणे (बारामती) : बारामतीतील वंजारवाडी येथील चौकात संध्याकाळच्या वेळी चालत व्यायाम करणाऱ्या महिलेला अर्धनग्न करुन १ लाख ५ हजार रुपयांना लुटलं. ही बारामतीतील अत्यंत घृणास्पद घटना, बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर घडली. ३० वर्षीय महिला बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास वंजारवाडी चौकातील उड्डाणपुलाजवळ चालण्याचा व्यायाम करत असताना लंघुशकेच्या निमित्ताने ती शेजारील उसाच्या शेतात गेली असता, एक अनोळखी इसम तिच्या मागा आला. त्याने चाकू काढत तिच्या गळ्याला लावला आणि गळ्यातील दागिने काढायला लावले.ती महिला दागिने काढत असताना आणखी दोघेजण तिथे आले त्यातील एकाने पीडिताचे तोंड दाबून धरत तिचा मोबाईल जबरदस्त हिसकावून घेतला. तिला तिथून थोडे अंतरावरील विहिरीच्या कडेला असलेल्या उसाच्या पिकात नेण्यात आले. तेथे चाकूचा धाक दाखवत तिच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील टॉप्स, सोन्याचे अंगठी असे एक लाख पाच हजारांचे दागिने काढून घेण्यात आले.
त्यानंतर चाकू हातात घेतलेल्या युवकाने तिला कपडे काढण्यात सांगितले. तिने नकार दिला, तेव्हा तिची ओढणी बाजूला फेकून देण्यात आली. तिच्या अंगावरील टॉप फाडून काढला. तिच्या अंगातील पॅन्ट जबरदस्तीने काढून फेकून दिली. त्यातील एकाने तिचे अर्धनग्न अवस्थेतील फोटो काढत तिचा मोबाईल तिथेच फेकून दिला आणि ते तिथून निघून गेले. २५ ते ३२ वयोगटातील हे तिघे तरुण होते असं या महिलेने फिर्यादीत म्हटलं आहे.

फायनान्स कंपनीत कोयता दाखवून दहशत
दरम्यान, दौंड शहरातील श्रीराम फायनान्स या खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात सात जणांनी काल दुपारी राडा घातला. कोयता घेत दाखवत दहशत माजवणाऱ्या सात जणांविरोधात दौंड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, यामध्ये एका जुगार चालवणाऱ्या सेंटरचालकासह माजी नगरसेवकाच्या भावाचा देखील समावेश आहे. २६ जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संजय भीमराव बारवकर, राजेंद्र उर्फ राजू भीमराव बारवकर, अमित बारवकर, नागनाथ गोविंद भगत या चौघांसह आणखी तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समाज माध्यमातून व्हायरल झाला.