Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवारांनी कंबर कसली! ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वपक्षीय नेत्यांची लगबग सुरु झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यंदा राज्याचे राजकीय समीकरण बदलेले दिसते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडली आहे. तर राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना वरवर पाहता दिसून येत आहे. अशातच महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून शरद पवार राज्याचा दौरा करणार आहेत.

कसा असणार शरद पवारांचा दौरा

विधानसभेसाठी शरद पवार राज्यभर पक्षबळकटी साठी दौरा करणार आहेत. सुरुवातीला शरद पवार मागील विधानसभेत राष्ट्रवादीकडून लढवण्यात आलेल्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मस्थान किल्ले शिवनेरीवरुन करणार आहेत. ६ किंवा ९ तारखेपासून शरद पवार दौरा सुरु करु शकतात. यामध्ये प्रामुख्याने शरद पवार सभेच्या माध्यामातून राज्यातील प्रमुख जिल्हे आणि शहरांमध्ये सभा घेणार आहेत.
Sandeep Varpe: राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एकनिष्ठ, कोल्हे-काळेंच्या गडात पवारांचा शिलेदार ‘तुतारी’ वाजवणार?

राजकीय समीकरणे बदलली

पुतण्या अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्याकडे सध्या फक्त शरद पवार हाच एक चेहरा उरला आहे. राष्ट्रवादीत असलेले सर्वच बडे नेते अजित पवार गटासोबत गेले आहेत. त्यामुळे अशात पक्षाला पुन्हा शून्यापासून बळ देण्याचे काम शरद पवार करत आहेत. विधानसभेआधी राज्यभर दौरा करत शरद पवार राज्यातील राजकीय समीकरणाचा अंदाज घेण्याची शक्यता आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सुद्धा थेट लढा पवार कुटुंबातच विधानसभेच्या तोंडावर दिसण्याची शक्यता आहे.

शरद पवारांची अजित पवार गटाच्या मतदारसंघावर नजर

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार गेले आहेत. यामध्ये काही जागा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जात होते पण आता अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांना पुन्हा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच काही मतदारसंघात काही उमेदवार नाराज असल्याचे राजकीय वर्तुळात दबक्या आवाजाने चर्चा आहे. त्यामुळे दौरा करुन पवार पुन्हा भाकरी फिरवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे असेल

Source link

NCP partysharad pawar ncpSharad Pawar newssharad pawar vidhan sabha electionअजित पवार गटएनसीपीशरद पवारशरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Comments (0)
Add Comment