Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना सोबत घेणं हा आमचा आत्मघातकी प्लॅन, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

बीड : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे. पंधरा वर्षांपूर्वी धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात फिरत आहेत. अशातच जयंत पाटील हे शनिवारी (27 जुलै) रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या सदस्यांची बैठक घेतली.

मुंडेंना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन

जयंत पाटील यांना अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजपचा होता का ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ” गोपीनाथ मुंडे यांनी जे राजकारण केलं ते भाजप सध्या करत नाही. तो आमचाच आत्मघातकी प्लॅन होता”. असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.
Sharad Pawar : विधानसभेसाठी शरद पवारांनी कंबर कसली! ८३ वर्षांचा योद्धा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात

लाडकी बहीण योजनेवरून अजित पवारांवर टीका

जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले की,” राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 35 कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी ट्विट करत दिली. परंतु हे ट्विट अजित पवार यांनी केलं नाही. त्यांना बळजबरीने करायला लावले आहे. डॉन चित्रपटात बच्चनच्या पिस्तूलमध्ये गोली नव्हती हे फक्त अभिनेत्रीलाच माहीत होते. सध्या तशीच परिस्थिती लाडकी बहीण योजनेची झाली आहे”.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बीड मध्ये मोठा धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून लोकसभेच्या वेळी बीडमध्ये वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं होतं. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत .

Source link

beed newsdhananjay mundedhananjay munde newsjayant patil on dhananjay mundePankaja Munde TOPICजयंत पाटीलजयंत पाटील यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीकाधनंजय मुंडेधनंजय मुंडे बातम्याबीड बातम्या
Comments (0)
Add Comment