Mumbai Cylinder Blast: मुंबईत सिलिंडरचा स्फोट, झोपडीला भीषण आग, स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवली, पण…

मुंबई: मुंबईत एक भीषण सिलिंडर स्फोट झाला आहे. विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात ही भयंकर घटना घडली. या सिलिंडर स्फोटानंतर एका झोपडीला आग लागली. स्फोट होताच आजूबाजूच्या परिसरात एकच घबराट पसरली. आग लागल्याचं कळताच लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली

या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत लोकांनी पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. ही घटना कशी घडली याचा तपास सुरू आहे.
Mumbai Crime: वरळी स्पा हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, गर्लफ्रेंडबाबत धक्कादायक माहिती उघड, आणखी एकाला अटक

आगीत दोघे होरपळले, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

ही घटना घडली त्यावेळी झोपडीत उपस्थित असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ४६ वर्षीय धनंजय मिश्रा हे ९९ टक्के भाजले आहेत. तर, ४५ वर्षीय राधेश्याम पांडे हे ९२ टक्के भाजले आहेत. दोघांनाही राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, यापैकी राधेश्याम पांडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सध्या तपास सुरु आहे.

विक्रोळीतील झोपडपट्टीतील एका झोपडीत सिलेंडरचा भीषण स्फोट

विक्रोळी पूर्वेकडील संजय गांधी नगर येथील झोपडपट्टीत शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एका झोपडीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यामुळे या झोपडीला आग लागली. ही झोपडी संजय गांधी नगर येथील श्रीराम सोसायटीत आहे. आगीमुळे तारांसह घरातील साहित्य जळून खाक झाले. तसेच, दोघं गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवली, अन् मग…

आग लागताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. पण, अग्निशमन दलाचे जवान पोहोचण्यापूर्वीच उपस्थित लोकांनी विजपुरवठा खंडित करुन, पाणी टाकून झोपडीची आग विझवली. त्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.

Source link

mumbai cylinder blastmumbai live newsmumbai lpg gas cylinder blastmumbai newsvikhroliमुंबई आगमुंबई बातम्यामुंबई सिलिंडर ब्लास्टविक्रोळी सिलिंडर स्फोटसिलिंडर स्फोट
Comments (0)
Add Comment