भाजपने जरांगे पाटील आणि त्यांच्या मागण्यांना विरोध आहे की, समर्थन आहे ? हे एकदा जाहीर करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकर यांनी केले. ते धाराशिवमध्ये बोलत होते.
निवडणूक होईपर्यंत राजकीय पक्ष यावर तोडगा काढणार नाहीत. आरक्षणाच्या प्रश्नाला हे असेच झुलवत ठेवतील. पण आपल्याला मात्र सावध व्हायचे आहे. राजकीय मतभेद जेव्हा सामाजिक मतभेद होतात, तेव्हा द्वेषाचे वातावरण तयार होते. राजकीय पुढारी आपल्याला झुलवत ठेवत आहेत. त्यासाठी ओबीसींनाच आपला लढा उभा करावा लागणार आहे, असे आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीस यांना खालच्या भाषेत बोलतात. तरीही देवेंद्र फडणवीस आणि भाजप त्यांना काही बोलत नाही. ओबीसींना वाटत आहे की, फडणवीस आपला नेता आहे. हे फसवं राजकारण आहे हे लक्षात घ्या, असे आंबेडकर म्हणाले. मी ओबीसींना सांगू इच्छितो की, १०० आमदार निवडून आणल्याशिवाय आपण आरक्षण वाचवू शकत नाही हे लक्षात घ्या. आरक्षण वाचवण्यासाठी राजकीय ओळख निर्माण केली पाहिजे आणि ते करण्यासाठी ओबीसी म्हणून एकत्र आले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रमुख शरद पवार यांच्यावरही ॲड. आंबेडकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, राज्यात जे वातावरण पेटले आहे, ते शांत करण्यासाठी शरद पवारांना पाणी टाकायचं नाही तर डिझेल आणि पेट्रोल टाकून त्याचा भडका करायचा आहे. अशा नेत्यांपासून सावध रहा.