आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार असून या बाईकवर २०० लिटर पाण्याचे २ टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे २०० लिटर लिक्विड फोमचे टॅंक असणार आहे. आज येथे वितरित करण्यात येत असलेल्या फायर बाईकपैकी शिरपूर नगरपरिषदेला २, दोंडाईचा वरवाडे नगरपरिषदेला २ तसंच धुळे महापालिकेला २ फायर बाईक देण्यात आल्या आहेत.
पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते रोव्हर मशिनचं वितरण
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या रोव्हर मशिनचं वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आलं.
धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुक्यांमध्ये २०२३-२४ मध्ये एकूण १५ रोव्हर मिशन खरेदीला १ कोटी ६७ लाख ८५ हजार रुपये मंजूर केले होते. त्या मंजूर निधीतून धुळे जिल्ह्यात ऑनलाईन ई-मोजणी व्हर्जन २.० प्रक्रिया करण्यासाठी घेण्यात आले आहेत. या रोव्हरच्या माध्यमातून जीआयएस बेस मोजणी काम रियल कॉर्डीनेटच्या आधारे केलं जाणार आहे. धुळे जिल्ह्यात रोव्हरच्या माध्यमातून आजपर्यंत १ हजार ८६८ प्रकरणं मोजणी करण्यात आली असून या यंत्रामुळे जमिनीची अचूक मोजणी होत असून प्रशासकीय गतीमानतेत वाढ होणार आहे. यापूर्वी देखील १० रोव्हर मशिन जिल्हा नियोजन समितीमार्फत घेण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी दत्तात्रय वाघ महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी दुष्शत महाजन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.