Crime News: चोरट्यांची पोलिसांवर दगडफेक, नंतर प्रत्युत्तरात गोळीबार, सांगलीत रंगला सिनेस्टाईल थरार, काय घडलं?

सांगली: जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चोरट्यांनी चक्क पोलिसांवर दगडफेक केल्याचे दिसून आले आहे. कवठेमहाकाळ तालुक्यातील आरेवाडी आणि केरेवाडी येथे तीन ठिकाणी अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी शनिवारी रात्री सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कुऱ्हाड, चाकू आणि काठीने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
Crime News : सुपारीच्या नावाखाली नको तो उद्योग, पोलिसांना कुणकुण, कारवाईत ६ जणांना अटक, काय घडलं?
कवठेमहांकाळ पोलिसांनी या चोरट्यांचा पाठलाग केला. त्यानंतर चोरट्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी रात्री गस्तीवर असणाऱ्या उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी चोरट्यांवर गोळीबार केला आहे. पोलिसांनी केलेल्या पाठलागीनंतर एका चोरट्यास पकडण्यात यश आले. चारशीट्या शिंदे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात केरेवाडी येथील हिराबाई कोळेकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यांनी केरेवाडी येथील कोळेकर आणि दिगंबर करे, आरेवाडी येथील विजय बाबर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून ३ लाख ५० हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना केरेवाडी ते आरेवाडी दरम्यान रस्त्यालगत घरात चोरी होत असल्याची माहिती मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नियंत्रण कक्ष, उपअधीक्षक यांना फोनवरून दिली. तातडीने रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस लवाजमा घेऊन केरेवाडी येथील घटनास्थळ गाठले. त्याचवेळी अज्ञात चोरटे आरेवाडी येथील रस्त्यालगत चोरी करत असल्याचे दिसले. त्यावेळी उपअधीक्षक गिल्डा दाखल झाले.

पोलीस येत असल्याचे पाहून दोन मोटरसायकलवरून सहा चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्ग गाठला. पोलीस चोरट्यांचा पाठलाग करत होते. आपल्याला पोलीस पकडणार हे लक्षात आल्याने दरोडेखोरांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यावेळी स्वसंरक्षणार्थ प्रणिल गिल्डा यांनी गोळीबार केला. पोलिसांनी जिवाची पर्वा न करता झडप टाकून चारशिट्या शिंदे या सराईत चोरट्यास पकडले. सुमारे अडीच ते तीन तास पोलिसांचा हा थरार सुरू होता. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Source link

sangli crimeSangli newssangli stone peltingsangli stone pelting newsthieves pelted stones on policeदगडफेक बातमीपोलिसांवर दगडफेक बातमीसांगली गुन्हेगारीसांगली पोलिसांवर दगडफेक
Comments (0)
Add Comment