सांगली, स्वप्निल एरंडोलीकर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चार दिवसांपूर्वी गंभीर राज्याचे सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांनी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला होता असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. याच प्रकरणात अनिल देशमुखांनी फडणवीसांचा एक माणूस आपल्याकडे निरोप देण्यासाठी पाठवला होता असे सूचक विधान केले होते.
नेमके प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पाठवलेला माणूस सांगलीतील मिरजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी होता, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी केला होता. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम यांनी अनिल देशमुखांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट दिली, पुढे समित कदम फडणवीसांचा निरोप घेवून देशमुखांच्या भेटीला आले होते असा दावा देशमुखांनी केला आहे.
समित कदमांचे स्पष्टीकरण
आता देशमुखांच्या आरोपानंतर समित कदम म्हणाले, मी स्वतःहून अनिल देशमुख यांना भेटायला गेलो नव्हतो तर देशमुख यांनी मला भेटायला बोलावल्यामुळेच मी गेलो होतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना सांगून माझ्या अडचणी मध्ये काही मदत होते का अशी विनंती अनिल देशमुख यांनी केली होती असा दावा आता समित कदम यांनी केला आहे.
अनिल देशमुखांचा आरोप काय?
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दावा केला आहे की, समित कदम यांच्या सवादांची व्हिडिओ क्लीप असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. यासह १०० कोटींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे अनिल देशमुखांनी फडणवीसांना त्यावेळी सांगितले होते. तसेच समित कदम देशमुखांकडे चार ते पाच वेळा गेले असे दावा देशमुखांनी केला आहे. फडणवीसांने सांगितल्याप्रमाणे आरोप न केल्याने दुसऱ्या दिवशी इडीचा छापा आपल्यावर पडला असा देशमुख म्हणाले.