मुंबई : विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा आज, रविवारी शपथविधी आयोजित करण्यात आला होता. परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात आमदार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला.दरम्यान, यावेळी ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकरांनीही विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सही करुन आमदार मिलिंद नार्वेकर उपसभापती यांच्या शुभेच्छा न स्विकारत मागे फिरले. मग शेजारच्याच आमदारांनी त्यांना उपसभापती निलम गोऱ्हेंकडून शुभेच्छा स्विकारण्यासाठी आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांनी शुभेच्छा स्वीकारल्याचं पाहायला मिळालं.
आज विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी शपथ घ्यायला सुरुवात करताच उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यांना थांबवलं. ”मी म्हटल्यावर तुम्ही पुढे बोला”, असं यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पंकजा मुंडे यांना सांगितलं.कोणकोणत्या आमदरांनी घेतली शप्पथ?
आज विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. यावेळी शपथ घ्यायला सुरुवात करताच उपसभापती नीलम गोऱ्हेंनी त्यांना थांबवलं. ”मी म्हटल्यावर तुम्ही पुढे बोला”, असं यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पंकजा मुंडे यांना सांगितलं.
कोणकोणत्या आमदरांनी घेतली शप्पथ?
पंकजा मुंडे – भाजप
योगेश टिळेकर – भाजप
अमित गोरखे – भाजप
परिणय फुके – भाजप
सदाभाऊ खोत – भाजप
भावना गवळी – शिंदे शिवसेना
कृपाल तुमाने – शिंदे शिवसेना
शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राजेश विटेकर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
प्रज्ञा सातव – काँग्रेस
मिलिंद नार्वेकर – उद्धव ठाकरे पक्ष
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उभे असलेल्या १२ उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची ८ मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून आले होते.