पेट्रोल भरायला पंपावर गेले आणि गाडीसह कोसळले, बीडमध्ये शिक्षकाला हार्ट अटॅक
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस पंपा जवळच राहत असलेले बाबासाहेब मिसाळ हे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांनी पहिल्यांदा पोलीस पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले. घरातून निघतानाच त्यांना छातीत दुखत असल्याचं जाणवत होतं. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष करत ते आपल्या कर्तव्यास निघाले. मात्र, जात असताना जवळ असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरण्यास गेले. त्यावेळेस त्यांच्या छातीत जास्त दुखू लागलं आणि अचानक ते गाडीवर बसले असतानाच गाडीवरून कोसळले.
हा सगळा प्रकार पेट्रोल पंपावरील नागरिक पाहत होते अचानक कोसळल्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. आपापल्या परीने त्यांना उठवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. फिट आल्यामुळे ते कोसळले असतील असा प्राथमिक अंदाज नागरिकांनी लावला. त्यामुळे त्यांना चपलांचा वास देऊन उठण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळाने उठत नसल्याचे पाहून एका नागरिकांनी त्यांना सीपीआर देऊन त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ते निपचित पडलेले होते.
नागरिकांनी मोठी गाडी बोलवून त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी पाहताक्षणी त्यांना मृत घोषित केलं. मात्र, सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. मात्र, या घटनेनंतर मिसाळ कुटुंबावर शोककळा पसरली आहे. यामुळेच या घटनेनंतर डॉक्टरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना आव्हान केलं आहे. असा काही प्रकार होत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला किंवा दवाखान्यात नागरिकांनी जावं अन्यथा मोठ्या घटनेला सामोरे जावं लागेल, असे सांगत शरीराची काळजी घेण्याचा आवाहन देखील बीडच्या अनेक डॉक्टरांनी केलं आहे.