छत्रपती संभाजीनगरमधील महिलेला १७ लाखांचा गंडा; तोतया CIDकडून ऑनलाइन वॉरंट निघाल्याची धमकी, प्रकरण काय?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : तुमच्या आधार कार्डवर एक नंबर घेण्यात आला आहे. या नंबरवरून मनी लॉड्रिंग होत असल्याचा संशय आहे. या आधारे मोठी कारवाई केली जाईल, अशी धमकी देऊन तोतया सायबर पोलिसांनी महिलेला १७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी सदर महिलेला कॉल करणाऱ्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात बीडबायपास रोडवर राहणाऱ्य एका महिलेने दिलेल्या तक्रारीत, १६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सदर महिलेला ७३८८१७०५९३ वरून कॉल आला. त्याने स्वत:चे नाव संजीतकुमार, असे सांगितले. तो ट्रायल डिपार्टमेंट नोटिफिकेशन युनिट येथून बोलत असल्याचे सांगून तुमच्या आधार कार्डवरून एक नंबर घेण्यात आल्याचे सांगितले. सदर नंबर हा महिलेच्या आधार कार्डाचा होता. महिलेने आपण कोणत्याही प्रकारचा नंबर घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. सदर प्रकरणात तुम्हाला ऑनलाइन तक्रार करावी लागणार असल्याचे सांगितले.
Courier Fraud Alert: वृद्धाला सव्वा लाखाचा गंडा; इंग्लंडहून पार्सल आल्याचा केला बहाणा, काय घडलं?
सदर महिलेला मोबाइलवर स्काइप नावाचा अॅप डाउन लोड करून घेऊन या ठिकाणी ऑनलाइन जबाब नोंदविण्यात आला. सदर महिलेला तिच्या आधार कार्डावरील नंबरवरून मनी लॉड्रींग होत असल्याचे सांगत, तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई होईल. तुम्हाला अटक करण्यात येईल. असेही सांगण्यात आले. यानंतर तिला स्काइपवरून १७ लाख २८ हजार रुपये एका खात्यावर भरण्यासाठी लावून या महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी मोबाइलधारकाच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी करीत आहेत.

महिलेने मोडली एफडी

या प्रकरणात सदर महिलेला अटक होईल; तसेच तिच्या विरोधात कारवाई होईल, असे सांगून धमकी देण्यात आली. यानंतर महिलेने सुरुवातीला दोन लाख २८ हजार रुपये सायबरचोरांनी सांगितलेल्या खात्यावर आरटीजीएस केले. यानंतर त्यांनी पुन्हा धमकी दिली. महिलेकडे पैसे नसल्याने तिने तिची एफडी मोडून सायबरचोरांना १५ लाख रुपये भरले.

Source link

beed bypass roadchhatrapati sambhajinagar crimefake cidsatara police station aurangabadछत्रपती संभाजीनगर न्यूजमनी लॉड्रिंगमहिलेची १७ लाखांची फसवणूक
Comments (0)
Add Comment