संवर्धनाअभावी ‘बनाना टायगर’ शिकाऱ्यांच्या टप्प्यात, सरकारच्या पोकळ घोषणा, वाघांसाठी संरक्षण क्षेत्र नाहीच!

प्रवीण चौधरी, जळगाव : खान्देशातील जळगाव जिल्ह्यात वाघांच्या संवर्धनांच्या उपाययोजनांअभावी सरकारकडून उपेक्षा केली जात आहे. मुक्ताई-भवानी वनक्षेत्रात अभयारण्याचा दर्जा देण्याची घोषणा करूनही अंमलबजावणी न झाल्याने खान्देशातील आठ-नऊ वाघ सुरक्षित अधिवासापासून वंचित आहेत. जळगावात वाघांच्या कातडीसह सहा तस्करांना नुकतीच अटक करण्यात आल्याने या वाघांच्या संवर्धनाबाबत होत असलेल्या शासकीय उदासीनतेमुळे केळीच्या बागांचा आसरा घेणारे हे ‘बनाना टायगर’आज शिकाऱ्यांच्या टप्प्यात आलेत की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जळगाव वन विभागात वढोदा वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्व आहे. या वनक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील वनक्षेत्रात सुमारे आठ-नऊ पट्टेदार वाघ आस्तित्वात आहेत. यासह गेल्या दोन वर्षांत यावल अभयारण्यातही वाघांचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. मात्र, या वाघांच्या संवर्धनाकडे सरकारच्या दुर्लक्षामुळे वाघांना परिसरातील केळीच्या बागांचा आसारा घेण्याची वेळ आली आहे.

पोकळ घोषणा अंमलबजावणी शून्य

जळगाव जिल्ह्यात वाघांचा अधिवास असल्याचे सिद्ध झाल्यानंतर वढोदा वनक्षेत्राची ‘मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन क्षेत्र’म्हणून गॅझेटमध्ये अधिकृपणे नोंद करण्यात आली. मात्र, त्या दृष्टीने अद्याप कोणत्याही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यानंतर जून २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुक्ताई-भवानी वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याचा घोषणा केली. मात्र, सरकारकडून अध्यादेश काढण्यात आला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सप्टेंबर २०२२ मध्ये मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर आले असता त्यांनीही मुक्ताई-भवानी अभयारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. तीही घोषणा पोकळ ठरली. अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद करण्यात आली नाही. अभयारण्यासाठी डोलारखेडा येथील ग्रामस्थांनी जमिनी देण्याची तयारी दाखविली. त्यासाठी समितीने सभा घेतली. जनसुनावणी होऊनही हा विषय रखडलेलाच आहे.
World Tiger Day : व्याघ्रमृत्यूत महाराष्ट्र दुसरे; मध्य प्रदेशात सर्वाधिक मृत्यू, चिंताजनक आकडेवारी समोर

वाघाच्या कातड्यांची तस्करी

पुणे व जळगावातील कस्टम अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून गुरुवारी (दि. २६) जळगाव तालुक्यातील नशिराबाद टोलनाक्याजवळ सापाळा रचून वाघाची कातडी विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांसह सहा जणांना अटक करण्यात आली. वाघाच्या कातडीवर बंदुकीच्या गोळीचे निशाण आहे. शिकार झालेला हा वाघ जळगाव जिल्ह्यातीलच आहे की नाही याबाबत स्पष्टता नसली तरी जिल्ह्यातील वाघांच्या संवर्धनाच्या ठोस उपाययोजना नसल्यानेच येथील वाघ आता शिकारी टोळ्यांच्या टप्प्यात आल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

२९ जुलै २०११ : जळगाव जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व अधोरेखित
०९ : जळगाव जिल्ह्यात वाघांची अंदाजेत संख्या

देशाचे वैभव व अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेले मुक्ताई-भवानी व्याघ्रसंवर्धन वनक्षेत्रातील वाघांना सुरक्षित संचारमार्ग व अधिवास उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या क्षेत्रात आठ-नऊ वाघ असल्याने अभयारण्याची घोषणा झाली. मात्र, उपायोजना झालेल्या नाहीत.

राहुल सोनवणे, वन्यजीव अभ्यासक

व्याघ्रमृत्यूत महाराष्ट्र दुसरे

‘टायगर स्टेट’ म्हणून ख्याती असलेल्या मध्य प्रदेशात चालू वर्षाच्या सुमारे सात महिन्यांत तब्बल २६, तर महाराष्ट्रात १६ वाघांचा मृत्यू झाला आहे. देशपातळीवर विचार करता चालू वर्षातील सुमारे सात महिन्यांत ८१ वाघ गमावले आहेत. मागच्या साडेपाच वर्षांतील आकडा ७०९ वर पोहोचल्याने वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. संपूर्ण देशभरात २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार देशात ३,१६७ वाघांची नोंद झाली. याच्या दुसऱ्या वर्षी २०२३ मध्ये आजवरचे सर्वाधिक १७८ वाघ गमावले. महाराष्ट्रात सर्वाधिक ५१, मध्य प्रदेशात ४०, तर कर्नाटक, केरळ व तामिळनाडूत प्रत्येकी १४ वाघांचा मृत्यू झाला होता. वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार वा नैसर्गिकरित्या हे मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणच्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात चालू वर्षाच्या सुमारे सात महिन्यांत तब्बल २६, महाराष्ट्र १४ तर कर्नाटकमध्ये ११ वाघांचा मृत्यू झाला आहे.
Dhule News : आगीवर नियंत्रण मिळवणं होणार सोपं, आपत्कालीन फायर बाईकचा असा होणार फायदा

बोलके आकडे…

वर्ष : मृत्यू
२०१९ : ९६
२०२० : १०६
२०२१ : १२७
२०२२ : १२१
२०२३ : १७८
२०२४ ते आतापर्यंत : ८१
एकूण : ७०९

सरकारने इकडे लक्ष द्यावे!

वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी अनुदानावर सौर ऊर्जा पुरविणे
अधिक संख्या झाल्यास वाघांचे स्थानांतरण करणे
वनविभागाने काही वनपरिक्षेत्रांसाठी कृती आराखडा तयार करावा
स्थानांतरण शक्य नसल्याने अधिक वाघ असलेला भाग अभयारण्य घोषित करावा
वनाचे शाश्वत जतन करून लोकांचे वनांवरील अवलंबन कमी करणे
वन्यजीवांचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी रस्ते बांधताना विचार व्हावा

Source link

mahayuti sarkartiger conservationvadhoda wildlife sanctuarywildlife jalgaonworld tiger dayजळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्रजागतिक व्याघ्र दिनमहायुती सरकारची उदासीनतावढोदा वनक्षेत्रवाघ संवर्धनाची उपेक्षा
Comments (0)
Add Comment