अनिलबाबू, फोटोला फोटोने उत्तर आम्हीही देऊ, समित देशमुख मविआ नेत्यांसह फोटो, चित्रा वाघ आक्रमक

मुंबई : फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येतं अनिलबाबू, यात कसला आला पराक्रम..? तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत, असा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यावर उत्तर देताना चित्रा वाघ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन व्हिडिओ शेअर करत टीकास्त्र सोडलं आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडलेल्या समित देशमुख यांचे एकत्र फोटोही वाघ यांनी पोस्ट केले आहेत.

चित्र वाघ काय म्हणतात?

“फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते अनिलबाबू… यात कसला आला पराक्रम..? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल..? अनिल देशमुख यांना आमचा प्रश्न आहे.. आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे का देत नाहीत..? त्यानंतरच्या तीन तासात तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत..!” असं चित्रा वाघ म्हणाल्या.

केशव उपाध्येंचंही टीकास्त्र

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समित देशमुख आणि ठाकरे गटाचे नेते-माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो एक्सवर पोस्ट केला आहे. ‘अहो अनिल देशमुख, फोटोवरूनच अर्थ काढायचे तर हा घ्या अजून एक फोटो. गृहमंत्री सारख्या अत्यंत जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तीने असे बेजबाबदारपणे वागणं शोभत नाही. खरंच काही ठोस पुरावे असतील तर न्यायालयात जा. अकारण फेक नॅरेटीव्ह पसरवू नका” असा टोला उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांना हाणला आहे.
Milind More : धक्का लागल्याने वाद, रिक्षाचालकाची साथीदारांसह मारहाण, ठाकरेंच्या जखमी शिलेदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू

काय आहे प्रकरण?

महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आदित्य ठाकरे, अनिल परब यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर दबाव आणला, माझ्या घरी त्यांचा खास माणूस पाठवला होता. त्याच्या मार्फत पत्र पाठवून मी मविआच्या नेत्यांवर खोटे आरोप करण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे, असा दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला होता.
Raju Navghare : भैया, ‘घड्याळ’ काढलं का? अजित दादांच्या आमदाराने चिन्ह हटवलं, तीन आमदार शरद पवार गटात?
देवेंद्र फडणवीस यांनी मिरजहून समित देशमुख नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे पाच ते सहा वेळा पाठवलं होतं. समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे कौटुंबिक संबंध असून त्यांची पत्नी समितला राखी बांधते. समित यांना सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षाही देण्यात आली असल्याचा दावा करताना अनिल देशमुखांनी समित-फडणवीस यांचे काही फोटो शेअर केले होते.

Source link

aaditya thackerayDevendra FadnavisMaharashtra politicsअनिल देशमुखकेशव उपाध्येशरद पवार Chitra Waghसमित देशमुख
Comments (0)
Add Comment