Narhari Zirwal : माझं ठरलंय, अखेर नरहरी झिरवाळ यांच्याकडून भूमिका स्पष्ट

नाशिक : अजित पवार गटाचे नेते आणि विधासभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात काही दिवसांपासून अनेक तर्क वितर्क चर्चा सुरू होत्या. नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार की अजित पवार गटात राहणार ? असा प्रश्न जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला होता. परंतु आता या सर्व चर्चांना नरहरी झिरवाळ यांनी ब्रेक दिला आहे.

नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे काही दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी झाले होते. गोकुळ झिरवाळ उपस्थित राहिल्यामुळे अजित पवार गटातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. या मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ”माझी छाती जरी फाडली तरी शरद पवार दिसतील” असं विधान केलं होतं. त्यामुळे मुलापाठोपाठ नरहरी झिरवाळ सुद्धा शरद पवार गटात जाणार का? असं प्रश्न सर्वांना पडला होता.
Sunil Tatkare : जयंत पाटलांच्या लाडकी ‘बायको’ योजनेच्या टीकेला सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर

मी अजित दादांबरोबरच राहणार

नरहरी झिरवाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की , ”मी अजित पवारांसोबतच राहणार आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा सुद्धा मी तेथे हजर होतो. माझ्या मुलाने काहीही सांगितलं तरी मी अजित दादांबरोबरच राहणार आहे. सर्व नेत्यांनी मिळून मला विधानसभेचा उपाध्यक्ष केलं. चार वेळा सरकार इकडे तिकडे झाले पण मी स्थिर आहे. दादांनी मला जे काही सहकार्य केलं ते अगदी मोठं आहे”.

मला आदिवासींचे प्रमुख म्हणून पाहतात

नरहरी झिरवाळ पुढे म्हणाले की, ” अजित पवार हे मला आदिवासींचे प्रमुख म्हणून पाहतात. मी जर एखाद्या खात्याचा मंत्री झालो असतो तर मला त्या खात्यापूरतच काम करायला मिळालं असतं. परंतु विधानसभा उपाध्यक्ष असल्यामुळे मला सर्व खात्यांचे काम करता येते”.

दरम्यान, सुनील तटकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते. त्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला नरहरी झिरवाळ उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चांना अधिक जोर आला होता. परंतु आता झिरवाळ आपण अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले.

Source link

narhari zirwalnarhari zirwal deputy speakerNarhari Zirwal newsnashik news todayNashik TOPICनरहरी झिरवाळनरहरी झिरवाळ बातमीनाशिक ताज्या बातम्यानाशिक बातम्या
Comments (0)
Add Comment