ज्यांनी शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला नकार दिला, त्यांचाच राज्याच्या ऐक्याला धोका: शरद पवार

मुंबई : रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला त्याकाळी काही वर्गातील लोकांनी विरोध केला. समाजातील काही घटकांनी राज्याभिषेक करण्यासही नकार दिला. म्हणजेच जुन्या कालखंडातही सामाजिक ऐक्याला धक्का देणारा वर्ग समाजात होता. दुर्दैवाने आजही तो कुठे ना कुठे आहे, असे विधान ज्येष्ठ नेते तसेच मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नवी मुंबई येथे एकता परिषदेच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविण्यात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची महती त्यांनी सांगितली. त्याचवेळी महाराष्ट्राच्या जनमानसांत आरक्षणप्रश्नावरून असलेली अस्वस्थता देखील विषद केली. महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती उद्भवली असती परंतु जाणत्या समाजसुधारकांचा वारसा राज्याला असल्याने सुजाण जनता हिंसेला थारा देत नाही, असे पवार म्हणाले.
Sharad Pawar : मला भ्रष्टाचाऱ्यांचा सुभेदार म्हणतात, स्वतः गुजरातमधून तडीपार झालेले, शरद पवारांचे बाण

दुर्दैव म्हणजे आजही तो घटक कुठे ना कुठे आहे…!

छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळात सामाजिक ऐक्यासाठी मोठे काम केले. देशात यादव, मुघल यांसारखी अनेकांची साम्राजे होऊन गेली. पण त्यांचे राज्य त्यांच्या नावाने ओळखले जायचे. शिवाजीराजे एकमेव राजे आहेत, त्यांचे राज्य भोसल्यांचे नव्हे तर रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात असे. साडे तीनशे वर्षांनंतही शिवाजी महाराजांचे आपल्याला कार्य आठवते, आपण स्मरण करतो ते त्यांनी केलेल्या अजोड आणि अद्वितीय कामामुळे. परंतु शिवाजीराजेंच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे त्याकाळात काही समाजघटक होते आणि दुर्दैव म्हणजे आजही तो कुठे ना कुठे आहेत, असे शरद पवार म्हणाले.

आपण राज्याचे ज्येष्ठ नेते, काहीतरी मार्ग काढा, मराठ्यांना आपल्याकडून अपेक्षा

‘मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मात्र, यासंबंधी शासन स्तरावर कोणीही निर्णय होत नाही. तुम्ही समाजाचे ज्येष्ठ नेते आहात. आपणच याबाबत तोडगा काढू शकता. त्यामुळे मराठा समाजाला आपल्याकडूनच मोठ्या अपेक्षा आहेत,’ असे साकडे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अहमदनगरमध्ये घातले.

Source link

Chhatrapati Shivaji MaharajChhatrapati Shivaji Maharaj Coronationikya parishad Navi MumbaiSharad Pawarsharad pawar speechऐक्य परिषद नवी मुंबईशरद पवारशरद पवार ऐक्य परिषद नवी मुंबई
Comments (0)
Add Comment