पुराच्या पाण्यातून पुढे निघाले, पूल ओलांडताना ट्रक वाहून गेला; चालक आणि क्लिनर बेपत्ता

जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर शहराला पावसाने झोडपून काढलं आहे. शनिवारी सकाळपासून तहसील परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे या भागातील नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसंच पुलावरून ट्रक वाहून गेल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावात घडली आहे. उमरेड हिंगणघाट मार्गावरील चिखलापार परिसर येथे रविवारी सायंकाळी पुराच्या पाण्यात बुडालेला पूल ओलांडण्याच्या प्रयत्न ट्रक चालकाकडून करण्यात आला.

या प्रयत्नात ट्रक चालक आणि त्याचा क्लिनर पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रविवारी रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. मात्र त्यांचा मृतदेह सापडला नसल्याने सोमवारी पुन्हा त्यांच्या मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला.
CM Eknath Shinde : अनधिकृत रिसॉर्टवर महापालिकेचा हातोडा, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई सुरू
उमरेड- हिंगणघाट मार्गावरील चिखलपार येथे असलेल्या पुलावर पाच ते सहा फुटांपर्यंत पाणी वाहत होतं. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. दरम्यान, चालकाने उमरेडहून हिंगणघाटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पुलावरील पुराचे पाणी सातत्याने वाढत असून, सुरक्षा व्यवस्थेसाठी महसूल विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. तसंच चालकाला ट्रक पुलावर नेण्यापासून रोखण्यातही आलं. असे असतानाही ट्रक चालकाने कुणाचंही न ऐकता त्याचा ट्रक पुलावरून नेण्यास सुरुवात केली. थोड्या वेळातच बघता बघता हा संपूर्ण ट्रक पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला.
Uran Murder Case: चेहरा अन् गुप्तांगावर वार; तरुणीचा मृतदेह पाहून पोलिसही हळहळले, उरणच्या हत्येनंतर निषेध
या ट्रकमध्ये चालक आणि क्लिनर असे दोन जण असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. ट्रक रिकामा असल्याने आण पाणी तीन ते चार फूट उंच असल्याने ट्रक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सततच्या पावसामुळे नांद धरणात पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे हा ट्रक वाहून गेला. ट्रक वाहून गेल्यानंतर ट्रक चालक आणि क्लिनर दोघेही बुडत्या ट्रकमधून किनाऱ्यावर उभ्या असलेल्या लोकांना मदतीसाठी हाका मारत होते.

तेथील लोक देखील मदतीसाठी प्रयत्न करत होते. मात्र लोक मदतीसाठी पोहोचतील तोपर्यंत बसचा चालक आणि क्लिनर पाण्याच्या जोरदार प्रवाहात बेपत्ता झाले. सोमवारी पोलिसांसह स्थानिक प्रशासन या दोघांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत आहे. अद्यापही दोघांचा मृतदेह हाती लागलेला नाही.

Source link

Nagpurnagpur news truck washed away in floodNagpur Rain Updateनागपूर ट्रक पुरात वाहून गेलानागपूर पाऊसनागपूर पुलावरुन ट्रक वाहून गेलानागपूर बातमी
Comments (0)
Add Comment