Raj Thackeray : शर्मिला ठाकरे आणि अंबानी कुटुंब! राज ठाकरेंनी सांगितला परदेशातील ‘तो’ किस्सा

पुणे : ज्येष्ठ चित्रकार शि.द. फडणीस यांच्या शंभरी निमित्ताने पुण्यात आज एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बोलताना आज राज ठाकरेंनी शि.द. फडणीस यांच्या कलेवर भाष्य केले तुम्ही चुकीच्या देशात जन्माला आला आहात असे राज ठाकरे शि.द. फडणीसांना म्हणाले, जर तुम्ही भारतात जन्मला असतात तर तुम्हाला सरकारला कलेसाठी दालन करा असे सांगावे लागले नसते कारण युरोपीय देशांमध्ये कलेसाठी एक वेगळा आदर आहे असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी पाश्चिमात्य देशात भारतीयांना कशाप्रकारे पाहिले जाते यावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी व्यंग चित्रकाराबद्दल बोलताना प्रसिद्ध व्यंग चित्रकार डेव्हिड लो (David Low) यांचा उल्लेख केला. तसेच त्यांनी युरोपातील त्यांचा एक किस्सा शेअर केला. राज ठाकरे डेव्हिड लो यांची पुस्तके घेण्यासाठी युरोपात गेले होते तेव्हा त्यांचा चेहरा भारतीय पाहून दुकानदाराने त्यांना अगदी तुच्छपणे पाहीले कारण भारतीय चेहऱ्यावर खरेदी करणार असे काय दिसत नाही, पण जेव्हा दुकानदारांना कळले की जास्त किंमत असलेले सगळी पुस्तके राज ठाकरे घेणार आहेत तेव्हा त्यांनी आदराने त्यांची विचारपूस केली.
Raj Thackeray : वय नसताना सरकार वाकलंय, याला त्याला घेऊ नका; राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना सल्ला

हाच किस्सा सांगताना राज ठाकरे यांनी हल्लीच त्यांच्या सोबत आणि शर्मिला ठाकरे यांच्या सोबत घडलेल्या किस्सा सुद्धा उपस्थितांसोबत शेअर केला. राज ठाकरे म्हणाले, हल्लीच मी आणि माझी पत्नी सोबत परदेशी गेलो होते, माझ्या पत्नी शर्मिला काही खरेदी करण्यासाठी गेली होती तेव्हा तिला दुकानातील व्यक्तीने विचारले तुम्ही अंबानी फॅमिली मध्ये आहात का? असा किस्सा राज ठाकरेंनी शेअर केला.


पुढे राज ठाकरे म्हणाले, शि.द. फडणीस आणि माझे वय जास्त असले तरी आम्ही दोघेही जे.जे आर्टस ऑफ स्कूल मधून आलोय. फडणीस सरांचे चित्र काढण्याची कला अप्रतिम आहे. सरांने एक व्यंग चित्राचा उल्लेख करण्यात आला जिथे मांजर आहे उंदीर आहेत आणि ते दोघे दूध पितायत, पण मी जर ते व्यंग चित्र काढत असेन तर मी व्यंग चित्र काढताना असे दाखवेल की मांजर मी कोणाच्या जातीच्या तो कोणाच्या जातीचा असा भांडत बसलाय आणि उंदीर दूध पिते. हा उंदीर म्हणजे आपला महाराष्ट्र असे राज ठाकरे म्हणत त्यांनी राज्याच्या सद्य स्थितीवर टीका केली.

Source link

ambani weddinganant radhika weddingraj thackeraySharmila Thackerayअंबानी लग्नअंबानी वेडिंगराज ठाकरेराज ठाकरे न्यूजशर्मिला ठाकरे
Comments (0)
Add Comment