Thane News: पावसामुळे छत गळत होतं, कामगाराच्या मुलाला छतावर चढवलं, तिथेच अनर्थ अन्… महिलेवर गुन्हा दाखल

डोंबिवली: राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे अनेक दुर्देवी घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता ठाण्यातून समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे घर गळत होतं, म्हणून महिलेने एका बिगारी कामगाराच्या शाळकरी मुलाला आपल्या घराच्या छतावर गळके छत दुरूस्तीसाठी चढवलं. छत दुरुस्तीचे काम करताना विद्यार्थ्याला विजेचा जोरदार धक्का लागला. या घटनेत तो जागीच मरण पावला. या प्रकरणी घर मालकिणीवर मृत विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Boy Jump From Building: टास्क पूर्ण करण्यासाठी १५ वर्षीय मुलाची १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; पिंपरीतील धक्कादायक घटना
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन जाधव (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रोशनचे काका यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कल्याण पूर्वेतील टाटा पॉवर, जय मल्हारनगर येथे बुधवारी हा प्रकार घडला असून आशा जैयस्वाल आडनाव असलेल्या घर मालकीण आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले, टाटा पॉवर जय मल्हानगर येथे आशा जैयस्वाल यांचे चाळीचे बैठे घर आहे. हे घर पाऊस सुरू झाला की गळते. घरात पावसाचे पाणी गळू नये म्हणून आशा यांनी ताडपत्री टाकण्याचा निर्णय घेतला. हे काम करण्यासाठी रोशन जाधवला सांगितले.

घराच्या छतावर पावसामुळे शेवाळ असल्याने छत निसरडे झाले आहे. रोशनला हातमोजे, हेल्मेट, रबरी बूट अशी जीव संरक्षणाची पुरेशी साधने देऊन मग घरावर चढविणे आवश्यक होते. अशी कोणतीही साधने न देता रोशनला आशा यांनी घराच्या छतावर चढविले. छत दुरुस्ती आणि त्यावर ताडपत्री टाकत असताना रोशनाला अचानक घरावरून गेलेल्या जिवंत वीज वाहिनीचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने रोशन घरावरून जमिनीवर फेकला. जमिनीवर जोराने आदळल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जैयस्वाल यांच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शाहू काळदाते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Source link

electric shock newsstudent died due to electric shockThane newsThane Rain Newsमहाराष्ट्र पाऊस बातमीरोशन जाधव बातमीरोशन जाधव मृत्यूरोशन जाधव विजेचा शॉकविजेचा शॉक मृत्यू बातमी
Comments (0)
Add Comment