पुणे : ज्येष्ठ चित्रकार शि.द . फडणीस यांच्या शंभरी निमित्ताने पुण्यात आज एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शि. द. फडणीस यांचा सत्कार केला. राज ठाकरे यांनी शि.द. फडणीस यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलत असताना थेट मंचावरुन चंद्रकांत पाटलांच्या समक्ष राज ठाकरेंनी सरकारवर टिप्पणी केली. ताट पद्धतीने सरकार चालवा असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी भर कार्यक्रमात पाटलांना दिला.
काय म्हणाले राज ठाकरे
शि.द. फडणीस यांच्या कार्यक्रमात बोलत असताना राज ठाकरेंनी महायुती सरकारवर थेट निशाणा ठेवला. राज ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले चित्रकार फडणीस यांना काय घ्यायचे, मला असे वाटते तितक्या ताट पद्धतीने सरकार चालले तरी खूप आहे, कारण इतके वय नसताना सरकार वाकलेले आहे. या झाडाची फळे पाहिजे त्या झाडाची फळे पाहिजे असे करु नका असा थेट सल्लाच राज ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना मंचावरुन दिला. राज ठाकरेंच्या सल्ल्यामुळे उपस्थित सारेही खळखळून हसू लागले.
पुढे शि.द. फडणीस यांच्याबद्दल बोलत असताना राज ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा गंभीर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, शि. द. फडणीस सरांचे आडनाव फडणीस त्यांना ‘व’ ने वाचवले ‘फडणीस’ म्हणून व्यगं चित्रकार झाले, ‘फडणवीस’ असते तर व्यंग चित्र झाले असते अशी थेट बोचरी टीका राज ठाकरेंनी केली. तर पुढे राज ठाकरे म्हणाले, आर्टस स्कूल मध्ये असणाऱ्या डीनला साधे फूल सुद्धा काढता येत नाही, चंद्रकांत पाटील म्हणाले अकादमी काढतो, पण तिथे शिकवणार कोण असा थेट सवाल राज ठाकरेंनी केला.
पुढे राज ठाकरे म्हणाले, शि.द. फडणीस आणि माझे वय जास्त असले तरी आम्ही दोघेही जे.जे आर्टस ऑफ स्कूल मधून आलोय. फडणीस सरांचे चित्र काढण्याची कला अप्रतिम आहे. सरांने एक व्यंग चित्राचा उल्लेख करण्यात आला जिथे मांजर आहे उंदीर आहेत आणि ते दोघे दूध पितायत, पण मी जर ते व्यंग चित्र काढत असेन तर मी व्यंग चित्र काढताना असे दाखवेल की मांजर मी कोणाच्या जातीच्या तो कोणाच्या जातीचा असा भांडत बसलाय आणि उंदीर दूध पिते. हा उंदीर म्हणजे आपला महाराष्ट्र असे राज ठाकरे म्हणत त्यांनी राज्याच्या सद्य स्थितीवर टीका केली.