Dhule News: भरधाव ट्रकची कारला धडक, पत्रकार तरुणाचा जागीच मृत्यू, घटनेत तिघे गंभीर जखमी

अजय गर्दे, धुळे: जिल्ह्यात अपघाताच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशाच एका घटनेत एका तरुण पत्रकाराने जीव गमावला आहे. शहराजवळील गरताडबारी येथे भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने एका चारचाकी वाहनाला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात मुंबई येथे कार्यरत असणारा तसेच धुळे जिल्ह्यातील बोरकुंड येथील रहिवासी पत्रकार हर्षल भदाणे पाटील यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या घटनेत अन्य तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तक्रार देण्यासाठी युवक गेला, टोळक्याला राग अनावर, पाठलाग करत पोलीस ठाण्यातच फिर्यादीला मारहाण, काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल भदाणे पाटील हे बोरकुंड येथे आपल्या गावी आलेले होते. यावेळी ते धुळे शहरात आले होते. सायंकाळी बोरकुंड गावी परत जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांची गाडी उभी होती. यावेळी समोरून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला उडवले. यावेळी हर्षल यांनी स्वतःला वाचवण्यासाठी वाहनातून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी ट्रकच्या मागील चाकात येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रस्त्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी एका दुचाकीला उडवत त्याच ठिकाणी हा ट्रक जाऊन थांबला.तर या चारचाकी वाहनात हर्षल यांच्यासोबत असलेले अन्य दोन जण गंभीर इतर जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेमुळे धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बघताच त्या ठिकाणी लोकांना धाव घेतली. संतापात नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. गाडीच्या काचा फोडल्या. यावेळी एक पोलीस कर्मचारी दगड लागून जखमी झाला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलिसांनी हा ट्रक सुपारीने भरलेला आहे. ट्रक चालक आणि क्लीनर या दोघांना ताब्यात घेतले आहे. हा ट्रक मोहाडी पोलीस ठाण्यात लावण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे. दरम्यान हर्षल भदाणे पाटील यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Source link

accident newsdhule accident newsharshal bhadane patil accidentharshal bhadane patil diesharshal bhadane patil newsharshal bhadane patil updateहर्षल भदाणे पाटील अपघातहर्षल भदाणे पाटील बातमीहर्षल भदाणे पाटील मृत्यू
Comments (0)
Add Comment