राजकारणासाठी राज्याला बदनाम करू नका, बावनकुळे यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी पुढाकार घ्या, राजकारणासाठी राज्याला बदनाम करू नका, असा हल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर चढवला. दंगली घडतील, अशी भाषा शरद पवार यांनी का केली, त्यांच्या मनात काय आहे, याची कल्पना नाही. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली राज्यात अशी स्थिती कधीही उद्भवणार नाही, असा विश्वासही बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर बोलतात हे काही चांगलं नाही. महाराष्ट्राचे अनेक वर्षे प्रतिनित्व त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही योग्य नाही. महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही आणि कधी होणारही नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
Nandurbar News : रस्ता नसल्याने गर्भवतेसाठी चादरीची झोळी; जंगलातून, पुराच्या पाण्यातून वाट काढली, राजकारण्यांनो, जमलं तर लक्ष द्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला काँग्रेसने कधीच सहकार्य केलं नाही. आरक्षणाचा मुद्दा योग्यरित्या हातळला नाही. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले. इतकेच नव्हे तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करण्याचे काम केले, असंही बावनकुळे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवण्याचे काम केले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीदेखील त्यांच्यावर राजकीय टीका केली. मराठा समाजाबाबत फडणवीस यांची भूमिका प्रामाणिक आहे. त्यांची उंची कमी करण्याचे प्रयत्न काही नेत्यांकडून चालले आहेत, अशी शंकाही बावनकुळे यांनी व्यक्त केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडीच वर्षानंतर संभ्रम निर्माण करत आहे. मंत्री असताना त्यांनी कारवाई का केली नाही, असा सवाल करून बावनकुळे म्हणाले, त्यांनी इतके राजकारण करण्याऐवजी राज्याच्या विकासाचा विचार करावा. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतली. राज्यात महायुतीची सत्ता येईल, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

Source link

Chandrashekhar BawankuleNagpur newsSharad Pawarचंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर टीकादेवेंद्र फडणवीसनागपूर बातमीशरद पवार
Comments (0)
Add Comment